प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: आंबेडकरी चळवळीतील माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा वाशीमकरांनी मोठया प्रमाणात घडवून आणलेल्या नागरी सत्काराने चळवळीतील नव्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळणार असून माझा सत्कार म्हणजे आंबेडकरी विचार व निष्ठा यांचा सन्मान असे उद्गार नागरी सत्कारा निमित्त आयोजित कार्यक्रमात गोपाळराव आटोटे गुरूजी यांनी काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक रामप्रभु सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून लाँगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे, नागपूर दीक्षाभूमीच्या विश्वस्त आचार्य प्रा. कमलताई रामकृष्ण गवई, स्वागताध्यक्ष म्हणून नारी शक्ती जागृती फाउंडेशनच्या महाराष्ट्र अध्यक्षा संगीता वसंतराव इंगोले, प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक आ. किरणराव सरनाईक, माजी आ. विजयराव जाधव, जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापतसुरेश मापारी, सभापती वनिता देवरे, नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य मुंबईचे कार्याध्यक्ष संजुभाऊ वाढे, सुरेखाताई वाढे, प्रतिभाताई सोनोने, पिरिपा राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, पिरिपा विदर्भ अध्यक्ष चरणदास इंगोले, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेश पडघाण गुरूजी, कारंजा न.प. अध्यक्ष शेषराव ढोके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले, जि.प. सदस्य दिलीपराव देशमुख, मधुकरराव जुगडे, जुलकिशोर कोठारी, माजी नगराध्यक्ष दिपकराव भांदुर्गे, डॉ. सिध्दार्थ देवळे, विनोद पट्टेबहाद्दुर , चरण गोटे, सिध्दार्थ देवरे, राजु चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख, पिरिपा जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, रिपाइंचे दे.वा. इंगळे, परमेश्वर अंभोरे, विजय मनवर, नितीन पगार, सय्यद रहेबर आदिंची उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी महेंद्र ताजने यांनी केले. कार्यक्रमा मागील भूमिका समन्वय समितीच्या वतीने सुनिल कांबळे यांनी मांडली. यावेळी गोपाळराव आटोटे गुरूजी यांना सत्कार समितीच्या वतीने स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र बहाल करण्यात येवून या सन्मानपत्राचे वाचन कवी शेषराव धांडे यांनी केले.
गोपाळराव आटोटे गुरूजी म्हणजे आंबेडकरी चळवळीचा धगधगता निखारा आहे. संघर्ष, निष्ठा व त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या भीमसैनिकाचा सत्कार होणे गरजेचे होते असे प्रतिपादन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सत्कार कार्यक्रमात केले. यानंतर कमलताई गवई, संजुभाऊ वाढे, जयदीप कवाडे, आ. किरणराव सरनाईक, माजी आ. विजयराव जाधव, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ गायकवाड, मधुकरराव जुमडे यांनी मनोगत व्यक्त केले. संपादक विनोद तायडे यांच्या सम्राट टाईम्स व प्रविण पट्टेबहाद्दुर यांच्या समताशाही या साप्ताहिकाच्या विशेषअंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याबरोबर संजुभाऊ वाढे यांनी संविधानाच्या 75 प्रतीचे उपस्थित मान्यवरांना वाटप केले. तद्नंतर राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेत प्राविण्य प्राप्त ऋषभ अजय ढवळे याला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी श्रेया अशोक खिराडे या चिमुकलीने आटोटे गुरूजींचे पेन्सीलने रेखाटलेले चित्र भेट दिले. आटोटे गुरूजींची नात भूमिका मिलींद आटोटे हिने आपल्यावर आजोबा करीत असलेल्या संस्काराचे भावविभोर चित्रण केले. यावेळी भारतीय बौध्द महासभा , मजदुर कामगार युनियन, पँथर द रिअल हिरो या संघटनेसह प्रतिष्ठीत नागरिकांच्या वतीने आटोटे गुरूजींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चाफेश्वर गांगवे व शिक्षिका ज्योती दिगंबर साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत संस्थेचे नवनियुक्त संचालक हेमंत तायडे यांनी मानले.
