पोलिसांकडून पैसे उकाळणाऱ्या तोतया इसमाच्या मुसक्या आवळुन केले जेरबंद, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

दिनांक २९/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने पोलीसांचा गुप्त बातमीदार असल्याची बतावणी करून बातमी देण्याचा बहाणा बनवुन पोलिसांकडून पैसे उकाळणाऱ्या तोतया इसमाच्या मुसक्या आवळुन केले जेरबंद

पहा व्हिडिओ

मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना पोलिसांना वारंवार फोन करून मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयसिंग साहेब बोलतो ” अशी बतावणी करुन पिस्टलची बातमी देण्याचा बहाना करुन पोलिसांकडून पैसे उकाळुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या तोतया इसमासविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक ०८/१२/२०२१ ते दिनांक २८/१२/२०२१ कालावधी दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कार्यालयामध्ये तसेच पोलीस नियंत्रण कक्षामध्ये वारंवार फोन करून मी विजयसिंग अहमदाबाद पोलीस आयुक्त साहेब बोलतोय, आपले पोलीस आयुक्त यांना फोन नंबर या ” असा कॉल आल्याने तोतया इसमास कार्यालयातुन मा पोलीस आयुक्त यांचा फोन नंबर देण्यात आला. त्यानंतर त्याने पुन्हा परत कार्यालयामध्ये कॉल करून तुमचे पोलीस आयुक्त यांना मी वारंवार फोन करतो परंतू ते माझा फोन उचलत नाहीत, त्यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हंडीमध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणात पिस्टलची डिल करणाऱ्या इसमांवर कार्यवाही करणेसाठी बातमी देणे आहे. तुमच्या गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक यांचे फोन नंबर मला या असे सांगितल्याने त्याला कार्यालयातुन वरील सर्व पोलीस अधिकारी यांचे फोन नंबर देण्यात आले.

त्यानंतर पुन्हा त्या तोतया इसमाने मा. पोलीस आयुक्त कार्यालयात फोन करून मी पोलीस आयुक्त यांना २५ वेळा फोन केला परंतू आपले मा पोलीस आयुक्त हे फोन उचलत नाहीत. तेव्हा कार्यालयातून सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व सपोनि डॉ. अशोक डोंगरे यांचे फोन क्रमांक देण्यात आले होते. सपोनि डॉ. अशोक डोगरे यांना तोतया इसमाचा फोन आल्याने त्यांनी तोत्तया इसमास सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस उपनि प्रदिपसिंग सिसोदे यांचा फोन क्रमांक दिला. त्यानंतर तोतया इसमाने पो.उपनि प्रदिपसिंग सिसोदे यांना फोन करून पुन्हा मी आपले मा. पोलीस आयुक्त यांचा व पोलीसांचा गुप्त बातमीदार बोलतो आहे. तुमचे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये ४ ते ५ पिस्टलची अवैध विक्री आज रोजी होणार आहे.

त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक सिसोदे यांना माहिती देवून त्यांचा विश्वास संपादन करणेसाठी त्यां व्हॉट्सअँपवर पिस्टल विक्री करणाऱ्या इसमांचे फोटो, गाडीचा फोटो व पिस्टलचे खोटे फोटो पाठविले व सदर करीता १५,०००/- रुपयाची गागणी करुन Khalilullaha Alyanulla Khan नावाचे स्टेट बैंक ऑफ इंडिया खाते नंबर, आयएफएससी कोड, बँक डिटेल्सच्या फोटोचा स्क्रिन शॉट पाठविला आणि गोरेगांव, मुंबई येथे राहत असल्याचे सांगितले. त्यावेळी सदरची बाब पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख देवेंद्र चव्हाण यांचे निदर्शनास आणुन दिली व झालेले प्रकारा बाबत माहिती दिली.

सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना वारंवार कार्यालयात फोन करणारा इसम हा आर्थिक फसवणुक करणारा असावा अशी शंका निर्माण झाल्याने त्याबाबत मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि प्रदिपसिंग सिसोदे पोलीस अंमलदार संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, मारुतीकरचुंडे, अतुल लोखंडे यांची टिम तयार केली

आणि तांत्रिक विश्लेषण करून तोतया इसम खल्लीउल्लाह अयानुल्ला खान (वय वर्ष 42) (रा. जनसेवा चाळ ,मुंबई, जोगेश्वरी वेस्ट ) हा गोरेगांव, मुंबई येथे असल्याचे निदर्शनास आल्याने टिम तात्काळ गोरेगाव, मुंबई येथे रवाना केली आणि सदर तोतया इसमावर कार्यवाही करणेसाठी त्याला बोलण्यात गुंतवुण ठेवुन विश्वास संपादन करणेसाठी प्रथम १५,०००/ रु व त्यानंतर ९,०००/-रु असे एकुण २४,०००/- रु रक्कम त्याने पाठविलेल्या पेटीएम व गुगलपेद्वारे पाठविले. नेमण्यात आलेल्या टिमने तोतया इसम खल्लीउल्लाह अयानुल्ला खान (वय वर्ष 42) (रा. जनसेवा चाळ ,मुंबई, जोगेश्वरी वेस्ट )गोरेगांव, मुंबई या ठिकाणाहुन सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेवून याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वी बरेच पोलीस अधिकारी यांना फोन करून अशाच प्रकारे आर्थिक फसवणुक केली असून

त्याचे विरुध्द मुंबई शहर येथे १) मालाड पोलीस स्टेशन २) गोरेगांव पोलीस स्टेशन ३) ओशिवरा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याचे विरुध्द पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी फिर्याद देवुन चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुरनं ४१६/२०२१ भादंवि कलम ४२०, ४१९, ४०६ १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया इसम खल्लीउल्लाह अयानुल्ला खान (वय वर्ष 42) (रा. जनसेवा चाळ ,मुंबई, जोगेश्वरी वेस्ट ) यास
सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील करीत आहेत. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक ३१/१२/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

• तोतया इसम हा ऑनलाईन पध्दतीने पोलीस नियंत्रण कक्षाचे फोन नंबर प्राप्त करायचा आणि •पोलीस नियंत्रण कक्षाची फोनद्वारे संपर्क साधुन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मोबाईल नंबर प्राप्त करायचा व त्यांचेशी संपर्क साधुन माझेकडे पिस्टलचे काम आहे अशी खोटी बतावणी करून तुमच्या अधिपत्याखालील कर्तव्य बजावणारे चांगले पोलीस अधिकारी यांच्याशी माझा संपर्क साधुन या मी त्यांना पकडून देतो असे सांगुन दुय्यम अधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांचेशी कॉन्फरन्सवर बोलून बातमी प्रमाणे तयारी करा असे सांगायचा, त्यानंतर दुय्यम अधिकारी यांचेशी संपर्क साधुन त्यांचे मोबाईलवर आरोपीचे व पिस्टलचे फोटो व ते ज्या वाहनाने येणार आहेत त्या वाहनाचे फोटो पाठवुन त्यांना विश्वासात घेवुन अॅडव्हान्स १०,०००/- रु ते १५,०००/- रु ची मागणी करायचा अधिपत्याखालील पोलीस अधिकारी यांनी ऑनलाईन पध्दतीने तोतया इसमास पैसे पुरविल्यानंतर तो इतर कारणे सांगुन आणखी पैशाची मागणी करायचा.

त्यानंतर तो अधिपत्याखालील पोलीस अधिकारी यांना उडवा-उडवीचे उत्तर देवुन काम पुढे ढकलल्याचे सांगुन मोबाईल बंद करून ठेवायचा अशी त्याची गुन्हा करण्याची पध्दत होती. तोतया इसमाने पोलीसांचा गुप्त बातमीदार असल्याची बतावणी करून वेगवेगळ्या फोन क्रमांकाचा वापर करून सन २०१५ साली पासुन

आर्थिक फसवणुक करीत असल्याचे तोतया इसमाने कबुल केलेले आहे. पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आवाहन करण्यात येते की, ज्याची अशाचप्रकारे तोतया इसमाने बतावणी करून आर्थिक फसवणुक केली असल्यास त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश मा. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) काकासाहेब डोळे, मा. सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, सपोनि सागर पानमंद, प्रदिपसिंग सिसोदे, पो.उपनि धैर्यशिल सोळंक पोलीस अंमलदार मच्छिद्र घनवट, विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, नितेश बिच्चेवार, नागेश माळी, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने, अमोल साडेकर, सुमित डमाळ, अमोल शिंदे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!