मोबाईल रिचार्जच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री,ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड

दर्यापूर – महेश बुंदे

कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला या काळात सर्व वस्तूची भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना, त्यात मोबाईल रिचार्जमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याने मोबाईल कंपन्यांनी एक प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली असून मोबाईल कंपन्यांचे चुकीचे धोरणामुळे सामान्य मात्र ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

वर्षाच्या शेवटी मोबाईल रिचार्जची वीस टक्क्याने भाववाढ करून मोबाईल कंपन्यांनी सर्वसामान्यांना चांगलाच झटका दिला. यात आयडिया २५०-२९९, जिओ २००- २४०, वोडोफोन २५०-३००, एअरटेल २५०- ३०० अशा प्रचंड भाववाढीमुळे मोबाइल ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असून एकापाठोपाठ एक आवश्यक वस्तूंच्या भाववाढीने सामान्य माणूस त्रस्त झाला असून सरकारने यावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटत आहेत.

शेतीमालाचे भाव वाढताच आर्थिक बजेट कोलमडले अशी ओरड सगळीकडे सुरू होते मात्र दररोजच्या जीवनात आवश्यक झालेल्या मोबाईल रिचार्जच्या भाववाढीने कोणाचेही आर्थिक बजेट कोलमडले नाही का असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.

मोबाईल रिचार्जची भाववाढ करून मोबाइल कंपन्या आर्थिक नफा मिळवत असून यात सामान्य ग्राहक पुरता भरडला जात आहे. ह्या प्रायवेट कंपन्यावरती ना सरकारचा अंकुश ना ट्राय टेलिकॉम चा..आज प्रत्येकाला मोबाईल महत्त्वाचा झाला आहे. एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल व त्याचा रिचार्ज लागतोच. अगदी फोन नाही आला तरीही माणूस फोन खिशातून काढून बघतोच इतका मोबाईल माणसासाठी अत्यावश्यक झाला आहे.

मोबाईल नंबरला सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागत आहे. या आधी रिचार्ज संपल्यावर इनकमिंग कॉलसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. तसेच ग्राहकाला सिम विकताना लाइफ टाईम फ्री इनकमिंग सेवा म्हणून कंपनीने सिम दिले आहेत तर जुन्या ग्राहकांकडून 999 ते 399 चे रिचार्ज करून लाइफ टाईम फ्री इनकमिंग सेवा म्हणून दर आकारले होते .मात्र आता रिचार्ज न केल्यास सात आठ दिवसांनी ही सुविधा देखील बंद केली जात आहे.

सुरूवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्यानंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये ३५ ते ४० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे. टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज मध्ये भरमसाठ वाढ केली असून ग्रामीण तर काही शहरी भागात नेटवर्क मिळत नसल्याने मारलेला रिचार्ज फुकट जात आहे.

तर इंटरनेट सेवा पण निकृष्ट दर्जाची मिळते. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी नेटवर्कमध्ये सुधारणा करावी असे ग्राहक वर्गातून बोलले जात आहे.सेवांच्या गुणवत्तेकडे पण लक्ष केंद्रीत करावे.जेवढी भरमसाट महागाई वाढवता तशी सुविधा देखील मिळत नाही एकुणच काय तर ग्राहक वर्गातून नाराजीचे सूर उमटत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!