श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा दर्शन सोहळा दर्यापूर शहरात तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ ला दुपारी तीन वाजता बस स्थानक शिवाजी चौक येथे मिरवणूक येणार असल्याचे आतिष शिरभाते यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या शुभ दिवसावर श्री जगनाडे महाराज व तुकाराम महाराजांच्या गादीची संताजी महाराजांच्या पादुका दर्शन घेण्याकरिता आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवण्याचे आवाहन आतिष शिरभाते तेली समाज तालुकाध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.