गावाच्या शाश्वत स्वच्छतेचा पासवर्ड ग्रामसेवकांच्या हाती,ओडिएफ प्लसबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व ऑपरेटरची कार्यशाळेचे उद्घाटन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-घरोघरी शौचालयाची उभारणी करुन गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, आता टप्पा 2 मध्ये स्वच्छतेच्या ईतर घटकावर कामे करणे अक्षित आहे. त्यामुळे गावाच्या शाश्वत स्वच्छतेचा पासवर्ड ग्रामसेवकाच्या हाती असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.


स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस) बाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राम पंचायत आॅपरेटर यांच्या दोन दिवशिय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते.


यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, मुंबई येथील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गावातील स्वच्छता आणि पाणी पुरवठा याबाबत जिल्ह्यातील परिस्थितीचे अवलोकन केले. जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडुन 100 कोटी रुपयाचा निधी आणल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्यास जल जीवन मिशनच्या माध्यमातुन महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेल. स्वच्छता व पाणी याबाबत केलेल्या कामाचे दस्तावेजीकरण (डाॅक्युमेंटेशन) करणे आणि ते संकेत स्थळावर म मोबाईल अॅपवर अपलोड करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगुन चंद्रकांत ठाकरे म्हणाले आपले विदर्भातील लोक नेहमी कामे खुप करतो पण ते दाखवत नाही, त्यामुळे आपण ऑनलाईनमध्ये मागे राहतो.

सिईओ व सुमना पंत:
या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी उपस्थित विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि संगणक परिचालक यांना मार्गदर्शन केले. ग्राम पंचायत स्तरावरील कामांची एसबीएम 2.0 (SBM2.0) या मोबाईल अॅपवर तसेच ईतर ठिकाणी अपलोड न केल्यामुळे वाशिम जिल्हा रेड झोनमध्ये येत आहे. ही आपल्या सर्वांसाठी गंभीर बाब आहे. माहिती, फोटो व ईतर दस्तावेज अपलोड केल्याशिवाय ते गाव ओडिएफ प्लस जाहिर करता येत नाही त्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर असलेली आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ग्रामसेवक व आॅपरेटर यांनी या कामामध्ये प्राधान्याने लक्ष घालण्याच्या सुचना सीईओ वसुमना पंत यांनी दिल्या. यावेळी मुंबई येथील विभागीय सल्लागार अरुण रसाळ यांनी ओडिएफ प्लसबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे, पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दूधाटे, विजय नागे आदिंनी या कार्यशाळेत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम श्रृंगारे यांनी केले. संचलन शंकर आंबेकर यांनी व आभार प्रदर्शन सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांनी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!