वाशिम जिल्ह्यात 29 डिसेंबर रोजी 4 हजार 940 व्यक्तींचे लसीकरण

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:- जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 28 डिसेंबर रोजी 4 हजार 940 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 476 व्यक्तींनी व दुसरा डोस 4 हजार 464 व्यक्तींनी घेतला.


वाशिम तालुका : पहिला डोस – 94 व दुसरा डोस -783 असा एकूण 877, मालेगाव तालुका : पहिला डोस – 76 आणि दुसरा डोस – 809 एकूण 885, रिसोड तालुका : पहिला डोस -75 व दुसरा डोस -952 एकूण 1027,कारंजा तालुका : पहिला डोस – 121 आणि दुसरा डोस -714 एकूण 835,मानोरा तालुका : पहिला डोस – 50 व दुसरा डोस 610 एकूण 660 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस -60 आणि दुसरा डोस – 596 असा एकूण 656 व्यक्तींना देण्यात आला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!