समृध्दी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी मुद्देमालासह पकडण्यात जऊळका पोलीसांना यश

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-पोलीस स्टेशन जऊळका हद्दित निर्माणाधीन समृध्दी महामार्गाचे काम प्रगती पथावर असुन महामार्गावर
ठेकेदार कंपनीचे स्टील रोड, डिझेल व इत्यादी महत्वाचे साहित्य मोकळया जागेवर पडलेले असल्याने सदरचे साहित्य चोरी होण्याची शक्यता होती. तसेच गुप्त बातमीदारा मार्फत माहिती होती की, आसपासच्या गावात चोरी करणारी टाळी सक्रीय असुन ते कधिही दरोडा, चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, म्हणून पोलिस स्टेशन जऊळका येथे रात्रगस्तीवर नेमलेले अधिकारी व अंमलदार यांना सदर भागात सतर्क गस्त घालुन कार्यवाही करण्याचे निर्देष देण्यात आले होते. दि. 29/12/2021 रोजी रात्री 09/30 वा. दरम्यान जऊळका शिवारातील रेल्वे ट्रेक जवळ समृध्दी महामार्गावर 10 ते 12 इसम चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने योग्य ते उचीत नियोजन करुन सदर चोरटयांना पकडण्याचे ठरविले. तसेच माहितगार इसम यांना देखील जागृत करण्यात आले. दरम्यान जऊळका शिवारातील रेल्वे ट्रेक जवळ समृध्दी महामार्गावर काही इसमांना दरोडा चोरी करतांना ठेकेदार बेमुलापल्लो सितारामया व त्यांच्या साथिदार मजुर व सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी ताबडतोब जऊळका पोलीस पोहचुन

संशयीत इसम नामे 1)अभिषेक अशोक डोंगरदिवे 2)आर्यन समाधान करवते 3) सुरज रविंद्र घुगे यांना ताब्यात घेण्यात आले व आसपास शोध मोहीम राबवून वरिल संशयीत इसमांचे इतर साथिदार 4. विष्णु सुभाष आंधळे 5, उमेश प्रल्हाद आंधळे 6, केशव तात्याराव घुगे 7.प्रषिकेश भारत नवधर वरील ते 7 रा. अनसिंग ता, मालेगाव जि. वाशिम यांना शितापीने ताब्यात घेवुन
त्यांच्याकडुन सुमारे 300 कि.मि वगनाच्या 82 नग आर्यन रॉड किंमत 16,500/- रुपये, संशयीतांनी गुन्हा करतांना वापरलेल्या सुमारे 1,20,000/- रुपये किमतीच्या ! दुचाकी वाहने व 52,000/- रुपये किंमतीचे 6 मोबाईल जप्त
करण्यात आले. असा एकुण 1,89,500/- रुपयेचा मुद्यमाल जप्त करण्यात आला.

तक्रारदार ठेकेदार वेमुलपल्ली सितारामया यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे अप.क्र. 400/2021 कलम 395 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यात आरोपी विष्णु सुभाष आंधळे 2. उमेश प्रल्हाद अधिळे 3. केशव तात्याराव घुगे +अषिकेश भारत नवघरे यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर टोळीमध्ये आणखी संशयीत इसमांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहे. यातील आरोपी विष्णु सुभाष आंधळे याचेवर पोलीस स्टेशन जऊळका व मालेगांव येथे एकुण 03 मारहाणीचे व दंग्याचे गुन्हे दाखल आहेत, पुढिल तपास जऊळका पोलीस करीत आहेत.


सदरची कामगिरी हो मा, पोलीस अधिक्षक श्री, बच्चनसिंग साहेब (IPS), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री
गोरख भामरे साहेब (IPS), मा, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि श्री. अजिनाथ मोरे, ASI निरंजन वानखेडे, HC किशोर वानखेडे, सचिन कल्ले,NPC सुनिल काळदाते, PC दिपक कावरखे, इसराईल पटाण, LIC शितल सरनाईक, सोनाली मोहोड यांनी पार
पाडलेली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!