स्वाधार योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ

अमरावती – महेश बुंदे

सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राज्यात राबविण्यात येते. यामध्ये स्वाधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत ३१ ड‌िसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राज्यातील शैक्षणिक प्रत्यक्ष बंद असल्या तरी या कालावधीत ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण सुरु असल्याने या दोन वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाने दि. २२ डिसेंबर,२०२१ रोजीचे पत्रानुसार मान्यता दिलेली आहे.

सन २०२०-२१ व २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या पात्र विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी दि.३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती कार्यालयात सादर करावे. दिलेल्या विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही याची संबंधीत विद्यार्थ्यांनी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. माया केदार, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!