प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-काही दिवसापुर्वी वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील ज्वेलर्सवर चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी अखेर पोलीसांनी नांदेड येथुन जेरबंद केल्याची माहीती मिळाली असुन सदर धमाकेदार कारवाई मा.पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने व ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात लेडी सिंघम अनसिंगच्या ठाणेदार नैना पोहेकर आणी त्यांच्या पोलिस टीमने केली आहे.
वाशिम जिल्ह्यात चोरींचे सञ सुरु असुन काही दिवसापुर्वी असाच चोरीचा प्रयत्न अनसिंग येथील ज्वेलर्सवर झाला होता परंतु सतर्क नागरीक आणी पोलीस गस्तीमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला होता.सदर चोरटे सिसिटिव्हीत कैद झाले होते परंतु ते पसार झाल्याने त्यांना शोधने हे पोलींसांपुढे मोठे आव्हान होते.या घटनेची वाशिमचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांनी गांभीर्याने दखल घेवुन चोरटे शोधन्याचे आदेश देत पोलीसांना याविषयी मार्गदर्शन केले.
