अवैद्य बांधकाम प्रकरणी मा सभापती भगवान पोखरकर यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी

पुणे : चाकण येथील आंबेठाण चौकातील गोरे पेट्रोलपंपाशेजारी चालू असलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी मा.सभापती भगवान पोखरकर यांवर पुन्हा चाकण नगरपरिषद यांचकडून महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम 1966 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चाकण मधील अवैद्य बांधकांमाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

चाकण पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार आंबेठाण चौकाशेजारील झित्राईमळा येथील गोरे पेट्रोल पंपाशेजारील जागेत गट नं 2172 व 2173 मध्ये अवैद्यरित्या बांधकाम चालु असल्याचे चाकण नगरपरिषदेला अनिकेत गोरे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता.

पतनिर्देशित अधिकारी यांनी स्थळपहाणी करून पंचनामा केला असता श्री.भगवान नारायण पोखरकर हे सदर अनधिकृत बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चाकण नगरपरिषद कार्यालयाने रीतसर पंचनामा करून श्री.भगवान नारायण पोखरकर यांना नोटीस क्र.पा.न/ न.र अनधिकृत बांधकाम 07/1968/2021 महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 53 अन्वये गट नंबर 21 72 व 2173 मधील एकत्रित जागेत पूर्व-पश्चिम 30.6 फूट व दक्षिण उत्तर 88.5 असे तळ अधिक 4 मजल्यांचे असे एकूण 13452 फुटाचे R.C.C अनधिकृत बांधकाम 30 दिवसाच्या आत काढून टाकण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती.

तरी देखील भगवान पोखरकर यांनी सदर बांधकाम उतरून घेण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे.याचा पंचनामा चाकण नगरपरिषडेकडुन सादर केला आहे.त्यामुळे चाकण नगर परिषदेकडून महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52,53,56 ते 43 ला धरून पोट कलम 6 अ नुसार लागू असलेले तरतुदींनुसार भगवान पोखरकर यांच्यावर फौजदारी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलिस करत आहे. त्यामुळे चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील अवैद्य बांधकामाचा विषय पुन्हा एकदा जनतेसमोर चर्चेत आला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!