दर्यापूर – महेश बुंदे
भारतीय जनता पार्टी दर्यापूर तर्फे मूर्तिजापूर रोड वरील रवींद्र ढोकने यांच्या कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.
