दर्यापूर – महेश बुंदे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३७ वा स्थापना दिवस संपूर्ण भारतभर साजरा होत असताना दर्यापूर तालुका मागे नव्हता, आज काँग्रेस स्थापना दिवस निमित्त दि. २८ डिसेंबर रोजी सुधाकर पाटील भारसाकळे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, तथा अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीत गाऊन व ध्वजारोहण करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
