सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हजारोच्या संख्येने नांदगावात धडक

टायर पेटवून केंद्र सरकारचा निषेध

युवा सेनेच्या दोन तास रास्ता रोकोने प्रशासनात खळबळ

युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केले होते एल्गार मोर्चाचे आयोजन ,केंद्रीय मंत्री दानवे यांचा फोटो ठरला लक्षणीय

नांदगाव खंडेश्वर/ओम मोरे

तालुक्यातील विविध मागण्याकरिता युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी केंद्र सरकारच्या विरोधात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा व रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले होते या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते दोन तास रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनि केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रचंड नारेबाजी केली व तहसीलदार यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या विरुध्द कापूस उत्पादकांचा मोर्चा गजानन महाराज मंदिर येथून डॉ पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेचे पूजन मोर्चाला सुरवात करण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने हजारोच्या संख्येने मोर्चाने मार्गक्रमण करून बस स्थानक परिसरात धडक देऊन दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी अमरावती यवतमाळ महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार कापसाला बारा हजार रुपये भाव देण्यात यावा, शेतीला दिवसाला विज पुरवठा करावा,पेट्रोल डिझलं व गॅसचे भाव कमी करा, उज्वला गॅस योजने अंतर्गतच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर द्या, कृषी व बि बियाण्यावरील जी एस टी टॅक्स बंद करा, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या, अमरावती यवतमाळ महामार्गाचे काम केंद्र सरकारच्या सि एस आर फंडातून करा पंतप्रधान आवास योजने अंतर्गत प्रपत्र ड यादीतील लाभार्थ्यांना घरकुल द्या, विदर्भातील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याकरिता व शेतीपिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणा करिता शेतीला कुंपणा करीता विशेष पॅकेज द्या, देशांतर्गत शेतमला व्यतिरिक्त परदेशातून शेतमाल आयात करू नका अश्या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मोर्चाला माजी खा शिवसेनेचे वर्धा जिह्याचे संपर्क प्रमुख अनंत गुढे,सुधील सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, डॉ प्रमोद कठाळे,स्वराज ठाकरे, रेखाताई नागोलकर,नितीन हटवार, छाया भारती,बाळासाहेब भागवत यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोर्चात अरुण लहाबर,सूरज औतकर अक्षय राणे मधुकर कोठाळे अक्षय काकडे पवन पुसदकर पवन खेडकर निखिल मोरे आशिष हटवार भावेश भांबुरकर शुभम सावरकर अक्षय तुपटकर मंगेश दांडगे अजय काळे आशिष भाकरे गौरव निभोरकर पवन ढगे वैभव वैश्य कमलेश मारोटकर शुभम साखी श्याम मुळे शुभम रावेकर भुमेश्वर गोरे अमोल धवस शुभम ढाकुलकर श्रीकृष्ण सोळंके मनोज बणारसे रेखाताई नागोलकर सुनील गुरमुळे भारत तिरमारे,भूषण शिरभाते, गौरव देशमुख, रोशन भातुलकर,ज्ञानेश्वर लांजेवार, विलास देशभ्रतार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

शेतकऱ्यांची बैलबंडीसह मोर्चात उपस्थिती

मोर्चात शेतकऱ्यांची बैलबंडीसह स्वयंस्फूर्तीने लक्षणीय उपस्थिती होती होती किशोर चौधरी हे शेतकरी बैलबंडी व डवरणीचे यंत्र सोबत सोबत घेऊन शेतातून डवरणी करून थेट मोर्चात सहभागी झाल्याचे आढळून आले

एल्गार मोर्चातील मागण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या दालनांत बैठक घेणार-अनंत गुढे

युवा सेनेच्या एल्गार मोर्चातील काही समस्या ह्या राज्यातील सरकारच्या अंतर्गत येतात या एल्गार मोर्चातील शिष्टमंडळाची लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनांत बैठक घेऊन त्या समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे मत माजी खा अनंत गुढे यांनी मोर्चाला मार्गदर्शन करतांना सांगितले

शेतकऱ्यांनसाठी आर परची लढाई– प्रकाश मारोटकर

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव भेटला पाहिजे शेतीला दिवसाचा विज पुरवठा झाला पाहिजे यासाठी आता आर पारची लढाई लढणार असल्याचे मत एल्गार मोर्चाचे आयोजक प्रकाश मारोटकर यांनी व्यक्त केले

आमचा बाप आमच्या कन्यादाना पर्यन्त टिकू द्या

या एल्गार मोर्चात तरुण मुलींनी मनोगत करताना बंगला बांधायला नव्हे तर आमचा बाप आमच्या कन्यादाना पर्यन्त टिकला यासाठी शेतमालाला भाव द्या अशे भावनिक आवाहन करत केंद्र सरकार विरुद्ध संताप व्यक्त केला यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!