रवि मारोटकर ब्युरो चीफ
लोक महर्षी, युग पथदर्शी स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 123 व्या जयंती उत्सवात पंचवटी चौकातील भाऊसाहेबांच्या पुतळ्यास स्मृती स्वरूपात अभिवादन करून संस्थेच्या निमंत्रण नुसार सहभागी झालो.
आज अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी कृषिरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल अत्यंत अभ्यास पूर्ण केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले .

त्यांनी याप्रसंगी डॉक्टर पंजाबराव देशमुख सामाजिक शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील योगदाना बद्दल भावपूर्ण उद्गार काढले.
त्यानंतर संस्थेचे सदस्य श्री हेमंतराव काळमेघ व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नन्दकिशोर चिखले यांच्या निमंत्रणा नुसार जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या पुष्पप्रदर्शनी उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झालो.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत राव काळमेघ यांच्या सूचनेनुसार 1961 साठी भाऊसाहेबांनी त्यांच्या जन्म गावी पापळ येथे सुरू केलेल्या शाळेस तसेच भाऊसाहेबांच्या जन्म वास्तुस भेट दिली व पापळ गावातील मुख्य चौकातील भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
