बातमी संकलन – महेश बुंदे
भारतीय राष्ट्रीय एकात्मता शिबिर ओरिसा येथे दिनांक १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२१ या काळात भुनेश्वर येथे संपन्न झाले. यामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांची दहा सदस्यीय चमू सहभागी झाली होती. या चमूचे व्यवस्थापक म्हणून डॉ. संतोष यावले होते. या चमू मधील अमरावती जिल्ह्यातील भारतीय महाविद्यालय अमरावती बी.ए.भाग- २ ची विद्यार्थिनी श्रेया बाबाराव भाकरे हिने राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये सहभाग दर्शविला होता. त्यात श्रेया भाकरे हिला राष्ट्रीय स्तरावरील रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
