चाकण औद्योगिक भागातील चिंबळी फाटा ( ता. खेड , जि. पुणे ) येथे रविवारी दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी स्फोट घडवून ATM वर दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. चाकण औद्योगिक परिसरातील चाकण चिंबळी -आळंदी रोडवर ही घटना घडली आहे.
चिंबळी येथील अँक्सेस बँकेच्या एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. चाकण MIDC परिसरातील चिंबळी – आळंदी या भर रहदारीच्या रस्त्यावर असलेलं AXIS बँकेचं हे ATM दरोडेखोरांनी लुटलं आहे. काल मध्यरात्री नंतर ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.धक्कादायक बाब म्हणजे ATM मधील रोकड लुटण्यासाठी चोरांनी चक्क स्फोट घडवून आणला आणि स्फोट एवढा भीषण होता की ATM मशीन चक्काचूर झालं आहे.

फुटलेल्या ATM मशीनचे तुकडे काही अंतरावर फेकल्या गेल्याचं समजतंय. मागील वर्षभरातील ही तिसरी घटना असल्याने ,महिलांवरील अत्याचार ,दिवसाढवळ्या खून आणि ATM लुटण्यासाठी गुन्हेगारकडून केल्या जात असलेला स्फोटकांचा वापर बघता आता मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जातीय का नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान या घटनेत फोडण्यात आलेल्या एटीएम मधून १३ ते १५ लाखांची रोकड गेल्याचा अंदाज व्यक्त इप्पर यांनी व्यक्त केला आहे. चोरीचा बदललेला ट्रेन्ड आणि त्यामध्ये वापरली जाणारी स्पोटके… त्याच बरोबर ATM फोडण्यासाठी गुन्हेगारांनी कोणतं स्फोटक वापरलं याचीही माहिती समोर आली नसल्याने पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. घटनास्थळी पोलीस पोचले असून BDDS बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळतेय.पोलिसांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर फवारला काळा ‘स्प्रे’