माजी विद्यार्थी महेश बुंदे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार संपन्न
दर्यापूर -डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्ताने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सत्कार सोहळा आणि माजी विद्यार्थी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते महेश बुंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहबंध सोहळा असा तिहेरी कार्यक्रम विविध पाहुण्याच्या हस्ते दि २६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलाचे वसतिगृह येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, प्रमुख पाहुणे समाजसेवक रामूशेठ मालपाणी, जेष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख, नगरसेवक जयंत वाकोडे, एकता हॉस्पिटलचे डॉ. इकबाल पठाण, इनस्पायर अकादमीचे सचिन टाले, सरकार अकादमीचे रवींद्र सरकार, माजी सरपंच रामहरी राऊत, क्रिडा शिक्षक संतोष मिसाळ, अमोल जाधव, महिला महाविद्यालयातचे प्रा.डॉ.गजाननराव हेरोळे, पत्रकार शरद रोहनकर, संजय कदम, धनंजय धांडे, अमोल कंटाळे, सचिन मानकर, किरण होले, गौरव टोळे, रवी नवलकार आदी उपस्थित होते. यावेळी विचार पिठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कोरोना काळात वसतिगृहात सेवा देणारे अधीक्षक अनिल खेडकर, शिपाई दिलीप राठोड, सुरक्षा रक्षक प्रदीप ठाकरे, शुध्दोधन बनसोड, शुभम गवळी, सफाई कामगार तुषार पचगाडे, धर्मेंद्र आठवले, शेखर शिरभाते, माळी विकास भोंगडे तसेच चित्रकार अनिल पुंडकर, पेपर विक्रेते सुनील सोनाळेकर, युवा व्यवसायिक चेतन व राहुल वाघमारे बंधू याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक महेश बुंदे यांचा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अनिल खेडकर संचलन व आभार धनंजय देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलाचे वसतिगृह येथील कर्मचारी व विद्यार्थी यानी परिश्रम घेतले.
