Post Views: 698
(डॉक्टर शाम राठी याच्या टीमने उपस्थित राहून रुग्णांच्या केल्या तपासण्या)
(शेकडोच्यावर रुग्णांच्या तपासण्या मोफत औषधी चे वाटप )
दर्यापूर – महेश बुंदे
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे व सर्व सोयी सुविधा युक्त एकमेव हॉस्पिटल म्हणून रिम्स हॉस्पिटल अमरावती शहरात प्रचलित आहे रिम्स हॉस्पिटल मध्ये असलेले तज्ञ डॉक्टर मंडळी डॉक्टर शाम राठी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाले सदर मोफत महाआरोग्य शिबिर हे दर्यापूर येथील रामदेव बाबा मंदिरा मध्ये घेण्यात आले होते दर्यापूर मधील डॉक्टर असोसिएशन , रामदेव बाबा मंडळ,मेडिकल असोसिएशन, यांच्या सहकार्याने संपन्न झाले .
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी ईसीजी आवश्यकतेनुसार बी एम आई, बोन डेन्सिटी टेस्ट, शुगर टेस्ट ,इत्यादी प्रकारच्या तपासण्या सुद्धा करण्यात आल्या या शिबिरामध्ये उपस्थित डॉक्टर निलेश चांडक हृदयरोग तज्ञ, डॉक्टर नितीन जयस्वाल स्पाईन सर्जन ,डॉक्टर स्वरूप गांधी न्यूरोसर्जन, डॉक्टर हितेश गुल्हाने किडनी तज्ञ ,डॉक्टर अमित भस्मे लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जन ,डॉक्टर विशाल बाहेकर मूत्र शल्यचिकित्सक ,डॉक्टर सुयोग राठी जॉइंट रिप्लेसमेंट व अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर तक्षक देशमुख प्लास्टिक सर्जन ,डॉक्टर स्वप्नील शर्मा तोंड घसा आणि मानेचे कॅन्सर तज्ञ ,डॉक्टर पूनम राठी स्त्री रोग तज्ञ, डॉक्टर विशाल भंसाली बाल रोग तज्ञ, डॉक्टर स्नेहल राठी दंतरोग तज्ञ, डॉक्टर विभूक्ती बुब फिजिओथेरपिस्ट ,इत्यादी तज्ञ डॉक्टर मंडळी यांच्या वतीने रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार देऊन यशस्वी करण्यात आले दर्यापूर शहरातील महाआरोग्य शिबिर हे ऐतिहासिक ठरले असून शेकडोच्यावर रुग्णांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवत डॉक्टर श्याम राठी यांनी आयोजकांचे आभार मानले.