जि.प.आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी दिला ६२ लक्ष रुपये निधी
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या हस्ते उदघाटन
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील तोंगलाबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ६२ लक्ष रुपयाची भव्य इमारत आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या निधीतून पुनर्वसन भागात बांधण्यात आली आहे, त्या इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम अमरावती जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा.श्री.सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई निरंजन पानझाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रहाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देशमुख, जिल्हा परिषद बांधकाम इंजिनिअर नरेंद्र निबुदे, ग्रामपंचायतचे सचिव विलासराव यादव, सदस्या ममताताई संतोष ठाकरे, अन्नपूर्णाताई हरिदास काळदाते, माजी सरपंच रामहरीभाऊ राऊत, माजी सदस्य गणेशराव जऊळकार, रामतीर्थ प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन गोळे, तोंगलाबाद उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मायाताई तायडे डॉ गोपाल जऊळकार आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब हिंगणीकर,सुधाकर पाटील भारसाकळे,डॉ राजेंद्र रहाटे,डॉ सचिन गोळे यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. यावेळी बाळासाहेब हिंगणीकर,सुधाकर पाटील भारसाकळे,सरपंच वैशालीताई पानझाडे,माजी सरपंच रामहरी राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन धनंजय देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक विलास यादव,निरंजन पानझाडे,आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक श्री. इंगळे,परिचर कडू मॅडम,आशा वर्कर हर्षाला काळदाते गणेशराव जऊळकार,विठ्ठल आगळे,अर्पित जळमकर,कार्तिक पवित्रकार,ग्रामपंचायत ऑपरेटर उमेश बायस्कार,शिपाई सुरेश चव्हाण व गावकरी यांनी परिश्रम घेतले.