Post Views: 432
आमदार बळवंत वानखडे यांच्याकडे नागरिकांनी केली मागणी
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथे दर्यापूर ते अमरावती रोडचे काम पूर्णत्वास आले असून रोडच्या उंचीमुळे अनेक ठिकाणी गटारीचा विषय रेंगाळत पडलेला आहे. असाच विषय आहे तो राधास्वामी सत्संग येथे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता असून रस्ता या नवीन रोडमुळे एकदमच खाली आलेला आहे.
त्या ठिकाणी परिसरातील सांडपाणी साचलेले आहे,ही वस्तुस्थिती आमदार बळवंत वानखडे याच्याकडे नागरिकानी मांडली, त्यावेमळी सुधाकर पाटील भारसाकळे व बाळासाहेब वसू यांच्या समवेत सत्संग परिसराला त्यानी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा वस्तुस्थिती पाहून आमदार बळवंत वानखडे यांनी त्वरित संबंधित इंजिनीयर,ठेकेदार त्यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे कळवले. तेव्हा सत्संग लगत असलेल्या नालीचे बांधकाम करून राधास्वामी सत्संग प्रवेशद्वारावर रस्त्याचे उंच बांधकाम करण्यात यावे, सांडपाण्याचा निचरा विल्हेवाट कशी होईल,याचा विचार करावा अशी मागणी राधास्वामी सत्संग प्रेमींनी केली आहे.