पुण्यात ठिकठिकाणी येशू ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा साजरा

पुणे वार्ता :- चर्च आणि परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई… चर्च परिसरात उभारलेला खिस्त जन्माचे देखावे… ख्रिसमस ‘ट्री’ ची नयनरम्य सजावट…, चर्चमधील प्रार्थना, गाणी, संदेश आणि शुभेच्छांचे वर्षाव, अशा आनंदमयी वातावरणात ख्रिस्ती बांधवांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ख्रिसमस सण साजरा केला.
दरम्यान, यावेळी कोरोनाचे संकट लक्षात घेत, ख्रिस्त बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगसह शासनाच्या 50 जणांची उपस्थिती या नियमाचे पालन केले.

शहरातील चर्च रोडवरील सेंट पॉल चर्च, रास्ता पेठेतील ख्राईस्ट चर्च, कसबा पेठेतील ब्रदर देशपांडे मेमोरिअल चर्च, कँम्प स्टेव्हली रोड येथील सेंट मेरी चर्च, घोरपडी पेठ येथील सेंट जोसेफ चर्च, कोंढवा खुर्द येथील अवर लेडी ऑफ लुडस चर्च, स्क्रेड हर्ट चर्च, एम्प्रेस गार्डन जवळील सेंट पॅट्रीक्स चर्च, क्वार्टरगेट चौकातील सिटी चर्च, बिशप हाऊस व शहरात ख्रिस्ती बांधवांच्या घरी येशू जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी ख्रिसमस ट्री, केक, बनविण्यात आले होते. सर्व ख्रिस्ती बांधवांनी यावेळी जगात सुख, समृध्दी आणि सगळीकडे शांतता, आनंददायी वातवरण कायम राहो आणि जगावर आलेले कोरोनाचे संकट जावो, अशी प्रभु येशुकडे प्रार्थना केली.

सेंट पॉल चर्चमध्ये सकाळपासूनच येशू ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सायंकाळच्या सुमारास नाताळ गीते येशू ख्रिस्त जन्म प्रवचन आणि केक कापून एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या अजूनही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आनंदी राहत ख्रिसमस हा सण साजरा करावा.– प्रो. जॉश्व रत्नम चींताला, सचिव, पुणे धर्मप्रांत

शहरावर करोनाचे सावट असले तरी शुक्रवारी ख्रिस्त बांधवांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करत नाताळ सणाचे जल्लोषात स्वागत केले. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कॅम्प परिसरात ख्रिस्त बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे चर्चचे प्रमाणही जास्त आहे. कँम्प परिसरात असणाऱ्या अनेक चर्चमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला प्रार्थना करण्यात आली. ख्रिस्त बांधवांच्या आदराचे प्रतीक असलेल्या नाताळ सणाने शहराचे वातावरण प्रसन्न झाले होते. या प्रसन्न वातावरणात शुक्रवारी तरुणाई सायंकाळच्या सुमारास एम.जी रोडवर उतरली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!