Post Views: 559
प्रहार विद्यार्थी संघटना दर्यापूर वतिने देण्यात आले निवेदन
दर्यापूर – महेश बुंदे
प्रहार विद्यार्थी संघटना दर्यापूर यांच्या वतीने बस अभावी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक व आर्थिक नुकसान व त्यांना होणारा मानसिक त्रास हे लक्षात घेऊन परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
शालेय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शाळेपर्यंत ये जा करणारी एसटीने प्रवास करतो एसटीने गेली ६७ वर्षे महाराष्ट्राच्या जनतेला सवलतीत आणि सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य एसटीच्या सेवेत शोभून दिसते यामुळे आम्हाला एसटीवर पूर्णपणे विश्वास आहे परंतु आजच्या घडीला एसटीची परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र आम्हा विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना सुद्धा दिस दिसू लागले आहे म्हणून आमच्या मनात ही भीती वाटत आहे की जणू एसटी पुढे जाऊन बंद तर होणार नाही किंवा तिथेच अस्तित्व भेटणार नाही किंवा तिचे खाजगी ग्रंथ होणार नाही ना कारण पण ते तसे आहे.
एसटीचे हे तत्व महामंडळ आणि आहे म्हणून सरकार एसटीकडे जाण जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे आणि आपण या जनतेबद्दल असलेल्या कर्तव्यापासून पाठ फिरवत आहे. परंतु सरकारची नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी जनतेच्या हितासाठी स्थापित केलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एसटीकडे लक्ष द्यावे तिचे सशक्तीकरण करावे एसटीची परिस्थिती सुधारावी यासाठी तिचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करून घ्यावे किंवा एसटीचे बजेट राज्य सरकारच्या अर्थसंकल्प बजेट मध्ये विलीन करून घ्यावे .
असे निवेदन प्रहार विद्यार्थी संघटनेचे निखिल वानखडे, तेजस गणेशपुरे, अनंता शेकोकार, तेजस कांबे, प्रतिक वानखडे, अजिंक्य पिंजरकर, आशिष गोळे, प्रज्वल पोटे, अर्पित थर्डक, उज्वल कडू व प्रथमेश गिरनाळे उपस्थित होते.