धक्कादायक..शेलपिंपळगाव येथे गोळ्या घालून युवकाची हत्या

खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे एका ३८ वर्षीय युवकाची गोळ्या घालुन निर्घृण खुन करण्यात आल्याचे समोर आले आहे. सदर घटना ही आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. नागेश सुभाष कराळे (वय ३८ वर्ष रा शेलपिंपळगाव ) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. खेड तालुक्याचे विद्यमान आमदाराच्या गावातच ही घटना घडल्याने पुन्हा तालुक्यात कायदा सुवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या घटनेने तालुक्यातील नागरिकांसह पोलिस यंत्रणा पुरती हादरली आहे. भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची हि घटना कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शेलपिंपळगाव येथील मिलिंद बियर शॉपी जवळ आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नागेश उभा असताना फोर्ड फोगो (एम एच १४ जे जे १३२३) क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या या गाडीतुन आलेल्या हल्लेखोरांनी नागेश याच्यावर बंदुकीतुन चार राऊंड फायर केले. गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले जखमी नागेश यास चाकण येथील जयहिंद हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले. चाकण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहे. संबंधित वाहनाची तपासणी केली आहे. चाकण पोलिसांनी काही भागात नाकाबंदी देखील केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शेलपिंपळगाव येथे धाव घेतली आहे. कराळे यांना चार गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कुणीही लागलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

नागेश कराळे हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील रस्त्यालगत आपल्या मोटारीत बसत असताना लगतचा दबा धरून बसलेले हल्लेखोर अचानक एका मोटारीतून आले. मारेकऱ्यांनी त्यांना भर रस्त्यात गाठले. त्यांच्यावर पिस्तुलातून एकापाठोपाठ गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

घटनेनंतर मारेकरी पसार झाले असून चाकण पोलिसांची पथके शेलपिंपळगाव येथे रवाना झाली आहेत. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे या भागात मोठा गोंधळ उडाला आहे. जुन्या वादातून हि घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. खून झालेले कराळे हे जिल्ह्यातील एका नेत्याचे जवळचे नातेवाईक आहेत. तालीम चालवणारे नागेश कराळे हे या भागात पैलवान म्हणून ओळखले जात होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!