प्रतिनिधी संकेत शिंदे
जुन्नर वार्ता :- बनकर फाटा या ठिकाणी खूप दिवसांपासून असलेले झाड काढण्यात आले पीडब्ल्यूडी ला यश बनकर फाटा या ठिकाणी खूप दिवसांपासून धोकादायक असलेले सर्वात मोठे लिंबाचे झाड सुखरूप काढण्यात आले.
या झाडाखाली पहिल्यापासून सर्व प्रवासी उभे राहत असत तसेच बनकर फाट्यावरती येणारा सर्वात मोठा मजूर वर्ग याच जागा खाली उभी असायची पण काही दिवसांपासून धोकादायक असलेले हे झाड काढण्यात आले. हे या झाडाखाली असणाऱ्या दुकान मालकांना देखील भिती वाटत होती त्यांना देखील त्यामुळे दिलासा भेटला त्यावेळी अमोल बनकर अमित बनकर ग्रामपंचायत सदस्य विनोद बोर मनसे उपाध्यक्ष जुन्नर तालुका राम शिंदे यांनी पीडब्ल्यूडी अधिकारी साहेब यांची जाऊन भेट घेतली त्यामुळे तात्काळ झाड काढण्यात आले .
