सुमारे २१०० च्या वर कामगारांनी केली नोंदणी
दर्यापूर – महेश बुंदे
देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या श्रम व रोजगार मंत्रालय मार्फत तयार केल्या जाणार्याश असंघटित कामगार जसे बांधकाम कामगार, भाजीवाले, शेतमजुर, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, फलविक्रेते, ऑटोवाले अशा ३७९ प्रकारच्या कामगारांच्या नोंदणीसाठी ई-श्रम कार्ड तयार करण्यात आले आहे.

याच्या नोंदणीसाठी देशातील व राज्यातील अनेक कामगार उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु काही केंद्राचालकाद्वारे अतिरिक्त पैसे घेऊन मोठ्या प्रमाणावर कामगारांची लूट केल्या जात आहे. हा विषय लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा, येवदा द्वारे युवा नेते अतुल गोळे यांच्या नेतृत्वात मोफत भव्य ई- श्रम कार्डचे शिबीर घेण्यात आले. सदर शिबीर शुक्रवार दि. १० तारखेपासून रविवार १२ तारखेपर्यंत सलग ३ दिवस घेण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून तालुक्याचे माजी आमदार श्री. रमेश बुंदेले, जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी वानखडे तालुक्याचे अध्यक्ष माणिकराव मानकर, खरेदी विक्री संघाचे सदस्य मदनराव बायस्कार, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख चंद्रकांत रघुवंशी, रामदास कराळे, दादाराव वांदे या मान्यवराच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
