Post Views: 3,222
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून व चाकण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विविध गुन्ह्यात असलेल्या 18 आरोपी गुंडांना तडीपार करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड आयुक्तालायकडून प्राप्त झाले आहे.त्यामुळे या गुंडांना लवकरच जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
चाकण औद्योगिक नगरी असलेल्या या ठिकाणी अनेक देशी विदेशी कंपन्यांनी चाकण औद्योगिक नगरीत बस्थान आहे.त्यामुळे या परिसराचा विकास हा झपाट्याने होत गेला आहे.परंतु या औद्योगिक नगरीत जसजसा विकास होत गेला त्याचप्रमाणे गुन्हेगारी देखील वाढली.अनेक ठिकाणी टोळ्या, माथाडी कंत्राटे, ठेके घेण्यावरुन खुन, मारामाऱ्या, अनधिकृत सावकारी होऊन कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेले पाहायला मिळत आहे.अनेक सराईत गुन्हेगार चाकण परिसरात आपले बस्थान बसवितात, अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा गुन्हे करतात.त्यांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत, याचाच गैरफायदा घेऊन गुन्हेगारीला अजुन खतपाणी मिळत आहे.
त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तलायकडून कडक उपाययोजना सुरवात करण्यात आली आहे.त्यामुळे चाकण परिसरामधील 18 गुंडांना तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अप्पर मंचक, व सहा.पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे व चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या माध्यमातून खालील गुंडांना तडीपार करण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे.
त्यामध्ये गौरव मच्छिंद्र डोंगरे वय 24 वर्ष रा. शनिमंदिर, चाकण , किशोर दशरथ जगनाडे वय 35 वर्ष रा. शनि मंदिर चाकण, मोरेश्वर उर्फ मोन्या संजय घोगरे वय 21 वर्ष रा. खंडोबा माळ. चाकण. रोहन महेंद्र घोगरे वय 22 वर्ष रा. खंडोबा माळ चाकण, किरण सुदाम गोतारने वय 34 वर्ष रा. आंबेडकर नगर चाकण, सुहास अरुण जाधव वय 29 वर्ष रा. खंडोबा माळ चाकण, नकुल उर्फ अमोल ज्ञानेश्वर कदम वय 23 वर्ष रा. काळूस , स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिंदे वय 28 वर्ष रा. रासे गावठाण चाकण, महेश संजय शिंदे वय 24 वर्ष रा. रासे, माधव रोहिदास गिते वय २५ वर्षे रा. बालाजीनगर चाकण, पियुष शंकर घाडगे वय २५ वर्ष रा घाडगेमळा चाकण, जितेंद्र भगवान मोरे वय ४२ वर्ष रा. झित्राई मळा चाकण ,रफिक शगीर काझी वय ३४ वर्ष रा. रोहकलरोड चाकण,आशिष रमेश काळुंखे वय २३ वर्षे रा. रोहकलरोड चाकण, दत्ता बाबुराव काळुंखे वय ४२ वर्षे रा. रोहकलरोड चाकण, रविंद्र चंद्रकांत आहिरे वय ४० वर्षे रा.एकतानगर चाकण (मुळ रा. साळवा, ता. धरणगा, जि. जळगाव), सचिन सुदाम परदेशी वय ३६ वर्ष रा.माणिक चौक चाकण ,मंदार सतिश परदेशी वय ३६ वर्षे माणिक चौक चाकण.
इत्यादी जणांना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे जास्त असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे व यांना जिल्ह्यातून हद्दपार(तडीपार) करण्यात आले आहे.