न्युज पेपरचा वापर खादयपदार्थ पॅकीग साठी वापरू नये

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दि. ०५/०८/२०११ पासुन लागु करण्यात आला आहे. सदर कायदयाचा प्रमुख उददेश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे.

अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव, पोहे या सारखे अन्न पदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्त पत्र छपाईसाठी करतात.

अशा न्युजपेपरमध्ये गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीय खादय सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी दि. ०६/१२/२०१६ आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तरी सर्व अन्न व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात येते की, न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा आपणाविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!