हा क्षण माझ्यासाठी अनमोल निर्माण करुन निरंतरपणे कार्यासाठी उर्जा देणारा- दिपक सदाफळे
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनात जिवरक्षक सेवा देऊन यांच्या प्राप्त प्रस्तावा नुसार 2001 पासून आजपर्यंत विविध आपात्कालीन तथा पोलीस घटनांमध्ये रेस्क्यु ऑपरेशन करुन सहा हजारांच्या वर नागरिकांना जिवदान दिले याच पद्धतीने सर्च ऑपरेशन करून तीन हजारांच्या वर बेपत्ता व अडकलेल्या मृतदेह शोधुन बाहेर काढलेत. या सोबतच सामाजिक क्षेत्रात “राष्ट्रसंत” “महापुरुष” यांच्या जयंतीनिमित्त समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजासाठी कार्य केले.
यामुळे अशा या आगळ्या वेगळ्या कार्याची दखल घेऊन जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या विस वर्षापासून निरंतरपणे सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी बद्दल यांना शिवाजी काॅलेजच्या अकोला येथील गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रथम वर्धापनदीन कार्यक्रमात 20 डिसेंबर 2021 रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यदीनाच्या पावन पर्वावर” 2021 गाडगेबाबा जिवन गौरव पुरस्काराने” गाडगेबाबा यांच्या पुण्य दीनाच्या पावन पर्वावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.अकोला येथील शिवाजी काॅलेज मध्ये वंसत सभागृहात दिमाखदार सोहळ्यात “स्मृतीचिन्ह” “सन्मान पत्र” शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी दिपक सदाफळे यांनी म्हटले की हा सन्मान मी माझ्या सहका-यांना जे आजही सेवादेत आहेत त्यांना समर्पित करतो.
