दर्यापूर – महेश बुंदे
संत गाडगेबाबा व संत रोहिदास महाराज व बोधीसत्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्य दर्यापूर येथे बहुउद्देशिय कलावंत व कलामंच दर्यापूर रजि. नं. ३२८ जि. अमरावती या संस्थेच्या वतीने या महापुरुषांचा आदर्श ठेवून व त्यांना अभिवादन करून संस्थेचे अध्यक्ष शामरावजी लहूपंचाग यांनी जनतेला स्वच्छता मोहीम राबविणे, झाडे लावा-झाडे जगवा असे मोलाचे मार्गदर्शन केले व लोकांची मन जिंकली. यावेळी श्री. रामेश्ववजी कावरे (गुरुजी) यांनी गाडगेबाबांच्या जिवनावार प्रकाश टाकला व लोकांची मने जिंकली.
