प्रतिनिधी राजेंद्र वाटाणे / अमरावती
स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे, महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात पुण्यतिथी साजरी करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.पुण्यतिथी प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे सर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. वर्षा चिखले उपस्थित होत्या. प्राध. डॉ वर्षा चिखले यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना, संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनदलित,अनाथ,अपंग यांच्यासाठी व्यतीत केले. गाडगेबाबांनी अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य केले. ते तळमळीचे कार्य करणारे समाज सुधारक होते. दीनदुबळ्यांची सेवा करणारे थोर संत होते.त्यांनी मूर्तिपूजेला नाकारले होते, देवळात जाऊ नका,अडाणी राहू नका,पोती पुराने,मंत्र व तंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका,अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव सोधणाऱ्या या संताने लोकांसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम ,विद्यालय सुरू केले. असे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.रामेश्र्वर भिसे सर यांनी संत गाडगेबाबा हे मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे एक समाज सुधारक होते. स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे ते पहिले समाजसुधारक होते.दीनदलित व पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यथित करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारका मधील संत होते. गाडगे बाबा प्रमाणे आपण विद्यार्थ्यांनी कर्म केले पाहिजे असे विचार प्रस्तुत केले.
