समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज – अनिल खेडकर
दर्यापूर – महेश बुंदे
जगाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात अधीक्षकांसह कर्मचारी माजी विद्यार्थी यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम अधीक्षक अनिल खेडकर यांनी संत गाडगे यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता विषयी दिलेल्या संदेश याबाबत अनिल खेडकर यांनी मार्गदर्शन करून वसतीगृहाच्या बाहेरील परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी अनिल खेडकर, दिलीप राठोड, विकास भोंगाडे, शेखर शिरभाते, तुषार पचगाडे, माजी विद्यार्थी महेश बुंदे आदी उपस्थित होते.