राजेंद्र वाटाणे/ अमरावती
अंजनगाव सुर्जी
काल दि.१७ ला रात्री १०:३० दरम्यान रहीमापुर चिंचोलीचे ठाणेदार सचिन इंगळे हे पोलिस स्टापसह विहिगाव ते कापुसतळणी या मार्गावर पेट्रोलिंग करत असताना विहीगाव येथील पावर स्टेशन समोरील नाल्यातून लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्राली वाळू भरून येत असताना पोलिसांना दिसला त्याला थांबवण्याचा इशारा केला असता त्याने ट्रक्टर न थांबवता त्याना धडक मारण्याचा उद्देशाने अंगावर आणला त्यामुळे मोटर सायकल वरून खाली पडले असता ठाणेदार सचिन इंगळे यांच्या हातला पायाला मार लागला.
