डाँक्टरांच्या हलगर्जी पणामुळे नवजात शिशुचा मुत्यु , अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात संतापजनक प्रकार


जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष, सत्कारात आहेत व्यस्त

‌ सरकारी डाँक्टरांचे खाजगी दवाखान्याकडे जास्त लक्ष


प्रतिनिधी राजेंद्र वाटाणे/ अमरावती

‌अंजनगाव सुर्जी :

‌अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे लखाड येथील सौ.निलिमा महेंद्र डोंगरे वय २३ या महिलेच्या बाळाचा डाँक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशू दगावले .झालेल्या घटने बदल जिल्हा आरोग्य अधिक्षक व जनप्रतिनिधी लक्ष देणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.



‌ सर्विस्तर माहिती अशी की,
‌ अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे दि.१७ डिसेंबर २०२० ला सौ.निलिमा महेंद्र डोंगरे वय २३ हि प्रसुती करिता १२:३० वाजताच्या दरम्यान भरती करण्यात आले.यावेळी सरकारी दवाखान्या मात्र एकही डाँक्टर उपलब्ध नव्हते यावेळी चौधरी नर्स व चंदाबाई हजर होत्या.

फोनवरुन डाँक्टरांनी संपर्क करुन गरोधर महिलेला इंजेक्शन द्यायचे सांगितले काही तासानंतर ग्रामीण रुग्णालयात डाँक्टर उपलब्ध झाले. व महिलेला तपासले असता तेव्हा ठोके येत होते त्यानंतर डाँक्टर निघुन गेले.

व ४:३० वाजता महिलेची प्रसुती झाली. चौधरी सिस्टर व चंदाबाई यांनी निलिमा या महिलेची प्रसुती केली तेव्हा नवजात शिशु बेशुध्द अवस्थेत आढळले.प्रसुती अगोदर बाळाचे ठोके येत होते. तेव्हा काही वेळानंतर डाँ अमोल नालट आले आणि त्यानी बाळाला १०२ रुग्णवाहिनी व्दारे येथील खाजगी सारडा रुग्णालयात नेण्याचे सांगीतले खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी बाळाला मुत घोषीत केले.

विशेष म्हणजे प्रस्तुती हि नॉरमल झाली महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास झाली. पण बाळ हे कसे दगावले
‌याचं कारण समजु शकले नाही.लाखो रुपये शाषनाचा पगार मिळवणारे हे डॉक्टर बालमृत्यू ला कारणीभूत आहेत .अंजनगाव सुर्जी येथील रुग्णालयाकडे पालकमंत्री,लोकप्रतिनिधी, आमदार व जिल्हा शल्य अधिक्षक लक्ष देतील काय? असा प्रश्न संपूर्ण तालुक्यातील नागरीकांना पडला आहे.



‌ अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात मागील वर्षी ३ बाळ दगावले असुन आता एक बाळ दगावले यावर शासनाने लक्ष देण्याची काळची गरज आहे. ग्रामीण रुग्णालयात एक १०२ व एक १०८ गाडी उपलब्ध आहे.आणि आमदार बळवंत वानखडे यांनी दिलेली रुग्णवाहिका अंजनगाव सुर्जी नगर परिषेदला दिली आहे मात्र तिचा काही उपयोग होत नसतांना दिसत आहे.लाखो रुपये खर्च शासन करित असतांना त्याचा फायदा जर सर्व सामान्य जनतेला होत नसेल तर फायदा काय? रुग्णवाहीका हि नेहमी नगर परिषद आवारात उभी धुळखात उभी असते हे विशेष.शाळा तपासणी करणारे दोन डाँक्टर, नर्स असा सहा लोकांचा स्टाँप दोन वर्षापासुन कोरोणा काळात कोणती शाळा तपासणी केली असे डाँ .नालट यांना विचारले असता त्यांनी मला माहित नाही असे त्यांनी सांगीतले.पण जनतेला प्रश्न पडला की हे भरारी तपासणी करणारे डाँक्टर दोन वर्ष काय करत होते .शासनाचा फक्त पगार घ्यायचेच काम करित होते काय?



‌प्रतिक्रिया….
‌१)
‌”महिला पेशंट भरती करुन घेतले तेव्हा मी हजर होतो.आणि जेव्हा प्रस्तुती झाली तेव्हा मी हजर होतो.प्रस्तुत महिलेच्या पोटात पाणी कमी होते व बाळाने पोटाच संडास केल्याने बाळ बेशुध्द झाले.आणि येथील खाजगी सारडा रुग्णालयात नेतांना नवजात शिशु दगावले. महिलेची नव्या महिन्याची सोनोग्राभी नसल्याने समजु शकले नाही.”
….डाँ.अमोल नालट
‌अधिक्षक,ग्रा. रु.अंजनगाव सुर्जी



‌२)
‌”मी माझ्या बहिनीला ग्रामीण रुग्णालयात आणले तेव्हा पण डाँक्टर उपलब्ध नव्हते. प्रस्तुती नंतर डाँक्टर आले.डाँक्टर जर लवकर आले असते तर नवजात शिशू दगावला नसता.”
‌….निखिल बाबुराव लबडे
‌प्रस्तती महिलेचा भाऊ रा.लखाड



‌३)
‌डाँक्टर ग्रामीण रुग्णालयात हजर नसतात आपल्या खाजगी रुग्णालयात जास्त वेळ देतात व सरकारी दवाखात कमी वेळ देतात पगार मात्र सरकारचा घेतात येथे रुग्णवाहिका उपलब्ध असुन रुग्णांना दिली जात नाही व रुग्णांनवर बरोबर उपचार सुध्दा होत नाही.”
‌….बाळासाहेब रोंगे
‌प्रहार तालुका प्रमुख
‌अंजनगाव सुर्जी.


‌४)
‌”नेहमीप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात दरमहा शेकडो प्रसूती नैसर्गिक रित्या होतात, परंतु प्रसुती काळामध्ये अशा प्रकारची घटना घडने ही अतिशय दुर्दैवी बाब आहे,ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून व रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेला हलगर्जीपणा यास जबाबदार असल्याचे दिसून येते.परंतु तरीही वेळेवर ग्रामीण रुग्णालयातून योग्य उपचार, मार्गदर्शन व सल्ला दिला गेला असता तर कदाचित नवजात बालकाचे प्राण वाचविण्यात यश प्राप्त झाले असते. यापुढे ग्रामीण रुग्णालय प्रशासन घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेईल आणि प्रशासकीय सेवेत, उपचारामध्ये सुधार घडविण्यात येईल,व रूग्णांना आवश्यक सुविधा वेळीच उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त करतो.”
‌…विजय वानखडे
‌सामाजिक कार्यकर्ता



‌५)
‌”शासन लाखो रुपये रुग्णालयात खर्च करत आहे परंतु अशाही परिस्थितीत बाळ दगावत असेल तर शोकांतिका आहे यावर डॉक्टरांचा हलगर्जीपणा म्हणावं की लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.”

‌…मंगेश इंगळे
‌ युवा पत्रकार



‌६)
“अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात साथीच्या रोगांमध्ये तीनशे चारशे रुग्ण निघत असताना मात्र शंभरच दाखवली जाते बाकीच्या ओपीडीचे पैसे जातात कुठे? यावर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे येथे ओपीडीच्या रक्कमेचा अपहार होत आहे. या प्रकार शासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुलक्ष आहे.”
अशोक मोरे
सामाजिक कार्यकर्ता

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!