Post Views: 708
‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने भारतीय डाक विभाग शिक्षण मंत्रालय द्वारा केंद्रीय आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
भारत देशाचा ७५ वा अमृत महोत्सव देशभरात सर्वच स्थरावरून “आझादी का अमृत महोत्सव” या थीमद्वारे विविध उपक्रम राबवून साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय डाक विभाग व केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांकरिता पोस्ट कार्ड लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वर्ग ४ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. भारतीय डाक विभाग दर्यापूर यांच्या वतीने सुद्धा शहरातील प्रबोधन विद्यालय,आदर्श हायस्कूल, संत तुकाराम इंग्लिश स्क्रुल येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये तीन शाळेतील ७०० विद्यार्थी यांनी पंतप्रधान यांना पत्र लिहले. देशाला ७५ वर्षे पूर्ण झाल्या त्यानिमित्ताने ७५ लाख पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार आहे. यामधून देशभरातून सर्वंकृष्ठ ७५ पत्राची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये २०४७ सालातील मनापेक्षा अपेक्षित भारत व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अप्रकाशित स्वतंत्र सैनिक असे दोन विषय विद्यार्थ्यांना पत्र लिहण्यासाठी देण्यात आले होते.
दर्यापूर येथील भारतीय डाक विभाग यांच्या वतीने रेहपांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पठारे सर, बोचे मॅडम, चोपडे मॅडम, निशन मॅडम, चव्हाण मॅडम, झाडे सर, गवई व बायस्कर यांच्या सहकार्याने उपक्रम प्रमुख भारती होले व ठाकरे सर यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.