राजेंद्र वाटाणे /अमरावती
हिंगोली जिल्ह्यातील ….पोटा बु. ता.ओंढा येथील दी बुद्धिस्ट सोसायटी आॕफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा फलक अनावरण कार्यक्रम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश हनुमंते , महाराष्ट्र संघटक वैभव धबडगे यांच्या मार्गदर्शनात व हिंगोली जिल्हाध्यक्ष संदीप रणवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

भारतातील बौद्धांचे जागतिकस्तरावरील नेतृत्व आदरणीय राजरत्न आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष / विश्वस्त- दी बुद्धिस्ट सोसायटी आॕफ इंडिया) हे देश-विदेशात अहोरात्र प्रवास, कार्यक्रम संघटन बांधनी करत बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या झंजावती कार्याने प्रेरीत झालेल्या तरुणांना नेहमीच स्फुर्ती मिळत असल्यामुळे हे तरुण महाराष्ट्रभर नेतृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहेत. या मध्ये प्रामुख्याने दिनेश हनुमंते व आयु.वैभव धबडगे यांचे कार्य उलेखनीय आहे. हिंगोली जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी देखील तेव्हढ्याच तत्परतेने कार्य करत आहेत. म्हणून तर हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून आग्दी पाण्यातून प्रवास करत पोटा बु. गांवची ग्रामशाखा गठ्ठीत केली. आज दि.19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता ग्रामशाखा फलक अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर ग्रामशाखा फलक अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.संदीप रणवीर सर (जिल्हाध्यक्ष हिंगोली), हे होते. यावेळी आयु.राहुल घोडके (जिल्हा उपाध्यक्ष) , आयु.दिनाजी खाडे (जि.संपर्क प्रमुख), आयु.संभाजी मोगले (जि.महासचिव) इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. त्रिशरण-पंचशिल व महापुरुषांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर फलकाचे अनावरण करण्यात आले. शेवटी उपस्थित बौद्ध उपासक-उपासीका यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामशाखा अध्यक्ष आयु.मसाजी जाधव यांनी केले. सुत्रसंचलन आयु.सुभाष धबडगे यानी केले तर आभार आयु.अशोक जाधव, यांनी मानले.