दर्यापूर – महेश बुंदे
दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत धामोडी येथे सरपंच सौ. पुनमताई अमोल गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली “स्मार्ट कॉटन शेती दिन” साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच सौ. पुनमताई अमोल गावंडे, उपसरपंच संतोष पडघमोल तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. राजकुमार अडगोकार, मंडळ कृषी अधिकारी श्री कैथवास सर, कृषी तज्ञ प्रा.श्री. भडांगे सर, हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
