गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या मनाची मशागत शिक्षक सक्षमीकरणा अंतर्गत कार्यशाळा संपन्न

चाकण (ता . खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर – २ च्या रोटरी सभागृहात शुक्रवार दिनांक – १७ / १२ / २०२१ रोजी दुपारी ३ . ३० वाजता खेड तालुक्याचे प्रेरणादायी गटशिक्षणाधिकारी मा . श्री . संजय नाईकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रासे, मरकळ , कुरुळी , शिंदे , शिवे ,महाळुंगे व आंबेठाण या सात केंद्रांतील पुरुष शिक्षकांची कार्यशाळा अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात संपन्न झाली . पुणे जिल्हा परिषदेच्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत शिक्षक सक्षमीकरण याविषयी बोलताना संजय नाईकडे यांनी व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच शिक्षकांना व्यवसाय निष्ठा , सामाजिक , कौटुंबिक , भावनिक ,मानसिक ,व्यवहारिक , बौध्दिक , शैक्षणिक , साहित्यिक , आध्यात्मिक विकास करणे गरजेचे असल्याचे सांगितले . आजच्या धावपळीच्या युगात माणसाचे जीवन नीरस ,कंटाळवाणे व एकलकोंडे बनत चालले आहे . ताण – तणाव वाढत आहेत . नियमित तिच कामे करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे .

आज नको उद्या घेऊ ‘ म्हणत आयुष्याची संध्याकाळ जवळ येते , तरीही काही माणसे स्वतःसाठी जगत नाहीत .त्यामुळे जीवनाचा आनंद त्यांना उपभोगता येत नाही . जीवन सुंदर आहे , त्यामुळे नीरस आयुष्य न जगता जीवनात विविधता आणावी . समाज संपर्क वाढवावा . मित्र जोडावेत . कला शिकावी . छंद जोपासावेत . वाचन वाढवावे . पर्यटनाला जावे . नियमित व्यायाम करावा . सकस व संतुलित आहार घ्यावा .संपत्ती कमावण्यापेक्षा प्रामाणिक कर्तुत्वाने नाव कमवावे . असा मौलिक सल्लाही त्यांनी शिक्षकांना दिला .त्याचप्रमाणे गड -किल्ल्यांना भेटी देणे ,दुर्गभ्रमंती , ट्रेकिंग यांसारखे छंद जोपासून निसर्गाचा आनंद घ्यावा . त्यामुळे मनाला ताजेतवाने वाटते . यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच व खेड तालुक्यातील शिंगी या शिखरावर ट्रेकिंगला जाण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले .शिक्षकांनीही होकार देत रविवारी ट्रेकिंगला जाण्याचे निश्चित केले .अशा प्रकारे साहेबांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाने आनंदी व समाधानी जीवनाचे विविध पैलू मिळाले .यामुळे अनेकजण आतातरी जगण्याचे रुटीन बदलतील व राहिलेल्या दिवसांचा आनंद घेतील असे वाटते . साहेबांच्या समुपदेशनाने अनेकांच्या मनाची मशागत झाली आहे .

यावेळी केंद्रप्रमुख संदीप जाधव यांच्या हस्ते गुलाबपुष्प ,शाल ,श्रीफळ देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला .केंद्रप्रमुख दिलीप ठिकेकर , मारुती कांबळे , भारती उबाळे , नामदेव गायकवाड तसेच शाळांचे मुख्याध्यापक , शाळाप्रमुख ,शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते . आदर्श शिक्षक तुकाराम वाटेकर यांनी सूत्रसंचलन केले .कुरुळी केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!