दर्यापूर – महेश बुंदे
स्थानिक पंजाबराव कॉलनी येथे दत्त जयंतीच्या शुभपर्वावर महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. विविध फुलांची आरास मांडत वेगवेगळ्या फळांनी महापूजेची षोडपचारे रचना केली होती. दत्ताचे वस्त्र, भव्य रांगोळी, फुलांचा मकर, तांदुळाची रास, इत्यादीनी दत्ताचा मखर बनवण्यात आला होता. श्रीफळ, पपई, केळी, सफरचंद या फळांच्या रचनेसोबत त्यावर केलेली फुलांची मांडणी व दिव्याची आरास त्या महापूजेला शोभा आणत होती. पूजेवर बांधलेला पाळणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पूजा सुरू होत असताना सर्व भक्त गणांना गायलेली दत्ताची भजने सर्वांना भक्तिमय आनंदात घेऊन गेली होती.
