मुख्याध्यापकांची शालेय अभिलेखे कार्यशाळा संपन्न

बातमी संकलन – महेश बुंदे

आजच्या संगणकीय तंत्रज्ञानाच्या युगात शालेय कार्यालयाचे कामकाज हे जवळपास ऑनलाईन झालेले आहे. यामध्ये सर्व मुख्याध्यापक वर्ग डिजिटल क्षेत्रात निपुण व्हावा, त्यांना कार्यालयीन अभिलेखे व्यवस्थापनाबाबत पूर्ण माहिती व्हावी, शासन व शिक्षणाधिकारी यांचे कडून येणाऱ्या शैक्षणिक योजना सुव्यवस्थित राबविल्या जाव्या या उद्देशाने शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.अमरावती व अमरावती जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच सीताबाई संगई विद्यालय अंजनगांव येथे अंजनगांव-दर्यापूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बोकाडे गटशिक्षणाधिकारी पं.स.अंजनगांव, प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.अमरावती, डी.आर.देशमुख, माजी शिक्षणाधिकारी, शरद खंडागळे, माजी शिक्षण उपसंचालक, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ललित चौधरी, सचिव राजेश हुतके, अंजनगांव मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष केतन खिरकर, सचिव सुनील लव्हाळे, दर्यापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अल्का कोकाटे, सचिव परिमल नळकांडे, सीताबाई संगई विद्यालयाचे प्राचार्य शरद गोतमारे, प्राचार्य संजय संगई, प्राचार्य एस.डी.मते, अमरावती मुख्या.संघ शहर अध्यक्ष प्रदीप नानोटे इत्यादी अतिथी गण उपस्थित होते. याप्रसंगी अंजनगांव तालुका मुख्याध्यापक संघाकडून प्रफुल्ल कचवे शिक्षणाधिकारी (माध्य) यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मंचकावरील मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून जितेंद्र टावरी, रविंद्र गीरी,दिलीप अग्रवाल, कु. बोंडे यांनी पुर्ण वेळ प्रोजेक्टर द्वारे मार्गदर्शन केले.शालेय कार्यालयीन कामकाज सांभाळतांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्याचे शेवटी मुख्याध्यापकांनी प्रतिक्रियेतून स्पष्ट केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य शरद गोतमारे, प्रकाश खोब्रागडे, सुनील टांक, शाम कळमकर, वासुदेव जायले,हेमंत अग्रवाल, ठेलेकर, फिरदोस अली, महम्मद हमीद, मुकुंद तिमाने यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील लव्हाळे यांनी केले व आभार अल्का कोकाटे यांनी मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!