पुणे :- गेल्या 8 वर्षांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यत अखेर आज सर्वोच न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्याने चालु झाली.आणि एकच जल्लोष बैलगाडा मालकांनी केला.शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे.परंतु राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत ही गेली अनेक वर्षे या लढाईत अग्रभागी असलेले पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर मतदार संघाचे मा. खासदार आढळराव पाटील यांच्या गावात लांडेवाडीत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्याची रीतसर परवानगी ही दोनच दिवसात घेऊन पहिली बैलगाडा शर्यत भरवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
शिवाजी आढळराव पाटील यांनी नाचून केला आनंद व्यक्तपहा व्हिडिओ
लवकरच येत्या 2 दिवसात आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यत होणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कारण अनेक वर्षे आढळराव पाटील हे खासदार असताना त्यांनी गावोगावी बैलगाडा घाटात हजेरी लावली होती. तालुक्यातील अनेक बैलगाडा मालक हे त्यांना जवळुन परिचित असल्याने लवकरच परवानगी मिळाल्याने राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत ही मोठी होणार हे नक्की….त्यामुळे ह्या पहिल्या होणाऱ्या बैलगाडा शर्यतीकडे सर्व बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.