प्रतिनिधी कुणाल शिंदे पुणे :-
राज्यात बैलगाडा शर्यतीला सर्वोच न्यायालयाने परवानगी दिल्याने अनेक गाडा मालकांचा व वर्षानुवर्षे पाठपुरावा करणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बैलगाडा शर्यतींवर वेळोवेळी आवाज उठवणारे भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर दिल्लीवरून पुणे विमानतळावर आल्यानंतर बैलगाडा शौकिनांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निमगाव खंडोबाला भेट देऊन खंडोबा देवाची मनोभावे दर्शन घेऊन तळी भंडार भरन्यात आला.यावेळी गावातील गाडामालक,मान्यवर,सरपंच, उपसरपंच, व ग्रामस्थ,उपस्थित होते.बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने बैलगाडा मालकांकडून व ग्रामस्थांकडून आमदार महेशदादा लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

