स्वराज्य वार्ता कुणाल शिंदे
पुणे :- चाकण जवळील रासे गावात हद्दीतील इंडेन गॅस प्लँटच्या गॅस टँकरमधून गॅस चोरी करून तो काळ्या बाजारात विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकणमध्ये व ग्रामीण भागात व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरीचे प्रकार समोर येत असतानाच थेट कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे.याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री पावणे एक वाजता दि 12 डिसेंबर 2021 रोजी कारवाई करून टँकरमधून गॅसची चोरी करताना तिघांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

खेड तालुक्यातील रासे येथे कॅप्सूल टँकरमधून गॅस चोरी होत असल्याची माहिती सामाजिक विभागाला मिळाली होती.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,सामाजिक सुरक्षा पथकाला धोकादायक पद्धतीने कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी करताना आरोपी आढळून आले.त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली.गॅस टँकरमधून गॅसची चोरी करत असताना नरसिंग दत्तू फड (वय ३१), अमोल गोविंद मुंडे (वय २८, दोघेही रा. बीड), राजू बबन चव्हाण (वय ५२, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.कॅप्सूल टँकरमधून एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये धोकादायकपणे भरून गॅसची चोरी करताना आरोपी आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची कारवाई रविवारी मध्यरात्री करण्यात आली. नरसिंग आणि अमोल यांना इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथून रासे येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचा गॅस टॅंकर आणण्याबाबत परिवाहक म्हणून नेमले आहे. त्या दोघांनी मुंबई येथून रासे येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचे दोन टँकर चाकण येथे घेऊन जाणे अपेक्षित असताना ते टाळले. तसेच जाणीवपूर्वक वाहतुकीदरम्यान दोन गॅस टँकर मधून गॅस काढून घेण्यासाठी आरोपी राजू याला संमती दिली.
दरम्यान राजू याने त्याच्याकडील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने गॅस टॅंकर मधील गॅस चोरून घेतला. चोरीचा गॅस काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने, मानवी जीवन धोक्यात येईल अशा प्रकारच्या हयगयीने तो साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास कारवाई करत तब्बल १ कोटी १० लाख पाच हजार १४५ रुपये किमतीचा गॅस जप्त केला.
याबाबत पोलिसांत फिर्याद सामाजिक सुरक्षा पथकाचे हवालदार नितीन लोंढे यांनी दिली.
सिलिंडरचे वजन करावे-