भारतीय महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

बातमी संकलन – महेश बुंदे

भारतीय विद्या मंदिर अमरावतीद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र, इतिहास विभाग व डॉ.भा. ल.भोळे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चर्चासत्र लोकशाही आणि पर्यावरण या विषयावर आयोजित करण्यात आल होती. या चर्चासत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, भारतीय महाविद्यालय अमरावती , उद्घाटक प्रा. निशीकांत काळे, निसर्ग संवर्धन संस्था अमरावती, बीजभाषण डॉ. शैलेंद्र देवळाणकर, लेखक व आंतरराष्ट्रीय संबंधाचे विश्लेषक , प्रमुख उपस्थिती डॉ. अशोक काळे , सचिव डॉ.भा.ल. भोळे विचार मंच नागपूर . डॉ. धैर्यवर्धन पुंडकर अध्यक्ष ,अकोला जिल्हा राज्यशास्त्र परिषद. डॉ. प्रशांत विघे राज्यशास्त्र विभाग प्रमुख व परिषद समन्वयक व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ. प्रशांत विघे यांनी केले. चर्चासत्र घेण्यामागील भूमिका डॉ. अशोक काळे यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी चर्चा सत्रावरील रिसर्च जर्नल ( Research Journal) चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. आराधना वैद्य म्हणाल्या की, पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करा असे मत व्यक्त केले ,पुढे प्रा. निशीकांत काळे, उद्घाटन प्रसंगी म्हणाले की, प्रत्येकाने निसर्गाचा सवर्धन करणे काळाची गरज आहे. यासंदर्भात जगतील अनेक आंदोलनाचे उदाहरणे दिली. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, बीजभाषण करतांना म्हणाले की, जगातील विकसीत देश सार्वभौम सत्तेचा अतिरेकी वापर करून आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करताना दिसून येते. तेव्हा वाढते कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी केले पाहिजे, तरच येत्या काळात देश सुरक्षित राहील असे प्रतिादन केले. या सत्राचे संचालन डॉ.मिता कांबळे आभार डॉ. विजय भांगे यांनी मानले. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष – डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, प्राचार्य बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा जि. यवतमाळ हे बोलतांना म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने सोलर एनर्जीचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी होईल यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते – डॉ.अरविंद सोवनी, सी.पी. एम. & बेरार महाविद्यालय,नागपूर यांनी आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रात निरीक्षण करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी लहानातल्या लहान घटकांकडे लक्ष देऊन पर्यावरणाच्या संदर्भात सजक्ता दाखवणे गरजेचे आहे असे म्हणले. प्रमुख उपस्थिती डॉ. गोविंद तीरमनवार,इतिहास विभाग प्रमुख , ले. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय नांदगाव पेठ जि. अमरावती , यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील पर्यावरण व्यवस्थापन दर्शवून अनेक ऐतिहासिक दाखले देऊन विचार प्रकट केले. प्राचार्य डॉ.प्यारेलाल सूर्यवंशी , राजाभाऊ देशमुख महाविद्यायल, नांदगांव खंडेश्वर हयांनी मार्गदर्शन केले.या सत्राचे संचालन डॉ.सुनील इंगळे आभार डॉ. योगेश वडतकर यांनी मानले. चर्चासत्राच्या समारोपीयकार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, भारतीय महाविद्यालय अमरावती , प्रमुख उपस्थिती डॉ. अशोक काळे , सचिव डॉ.भा.ल. भोळे विचार मंच नागपूर .डॉ. ज्ञानेश्वर शंभरकर सह-सचिव डॉ.भा.ल. भोळे विचार मंच नागपूर , डॉ. वामन गवई, लेखक व राज्यशास्त्रचे अभ्यासक हे होते.
या प्रसंगी डॉ.भा.ल. भोळे विचार मंच नागपूर च्या कार्यकारणीचा विस्ताराची घोषणा सचिव अशोक काळे यांनी केली.या विस्तारीत कार्यकारणीमध्ये डाॅ प्रशांत विघे उपाध्यक्ष,प्रा धर्मेंद्र तेलगोटे सहकोषाध्यक्ष, डाॅ दिपाली घोगरे सहसचिव, डाॅ विलास टाले संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघटक,कार्यकारणी सदस्य डाॅ ममता पाथ्रीकर, डाॅ बबीता येवले, डाॅ आशिष काळे,डाॅ. शैलेश सोनोने,डाॅ शरद बेलोरकर,प्रा तानाजी माने,डाॅ सुशांत चिमणकर,संघटक डाॅ रवी बारपवार यांचा समावेश करण्यात आला. या सत्राचे संचालन डॉ.संदीप काळे आभार प्रा. लाभेश साबळे यांनी मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!