पुणे :- सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या बैलगाडा शर्यतीवर आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा उद्या सुनावणी घेण्याचे जाहीर करण्यात आले. आज संपुर्ण राज्याचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागले होते.परंतु आजचा निर्णय कोर्टाने उद्यावर ढकलण्यात आले आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालकांचे लक्ष उद्या होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे.
महाराष्ट्रातील गावांमध्ये व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने बैलगाडे हे पळवले जातात. आपल्या घरच्या मुलाप्रमाणे या लाडक्या बैलांचा मालक सांभाळ करत असतात.त्यामुळे गावच्या यात्रेत कार्यक्रमात बैलगाडा पळवण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात गाडा शौकीन जिल्ह्यात गावोगावी आहेत.परंतु काही वर्षांपासून सरकारने या शर्यतींवर बंदी घातली होती.त्यामुळे बैलगाडा मालक, व कार्यकर्ते नाराज झाले होते.अनेक बैलगाडा मालकांनी व संघटनांनी यावरती आंदोलने, कोर्टामध्ये याचिका देखील केली आहे.परंतु गेली 8 वर्षांपासून (2014 पासून) अजुन देखील कोर्टाचा अंतिम निकाल जाहीर झाला नसल्याने आता उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष निकालाकडे लागले आहे.त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे निकालात बैलगाडा शर्यत चालु होणार??? राज्यातील बैलगाडा शौकिनामध्ये नाराजी पाहायला मिळणार हेच पाहावे लागेल.