जिल्हा परिषद शिक्षिका तेजस्विनी अटाळकर शिक्षकरत्न पुरस्कारने सन्मानित

दर्यापूर – महेश बुंदे

तालुक्यातील तोंगलाबाद येथील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल मराठी शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कु. तेजस्विनी साहेबराव अटाळकर यांना शिक्षकरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. मदत सामाजिक संस्था नागपूर द्वारा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेच्या द्वारा १९ वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळा रविवार १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी सनदी अधिकारी तथा संविधान फाउंडेशनचे संयोजक ई. झेड. खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीष पांडव संचालक राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर, अनिल वैद्य माजी न्यायाधीश नाशिक, श्रीमती लीलाबाई चितळे स्वतंत्र संग्राम सैनिक तक्षशिला वाघधरे चित्रपट अभिनेत्री मराठी चित्रपट ‘नाळ’ आदी उपस्थित होते. या सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते शिक्षक रत्न पुरस्कार जिल्हा परिषद सहाय्यक शिक्षिका तेजस्विनी साहेबराव अटाळकर यांना प्रधान करण्यात आला. जिल्हा परिषद सहाय्यक शिक्षिका कु. तेजस्विनी साहेबराव अटाळकर ह्या गेल्या सहा वर्षापासून तोंगलाबाद येथील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल मराठी शाळा येथे कार्यरत आहेत. आजपर्यंतच्या त्याच्या सेवेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नंदकिशोर रायबोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा ही अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली आयएसओ नामांकित प्राप्त शाळा आहे. शाळेचा आज सर्वसुविधा असणारा निसर्गरम्य परिसर व डिजिटल क्लासरूम हे सर्व गावाच्या लोकसहभागातून व स्वतःच्या आर्थिक सहकार्यने त्यानी पूर्ण केले आहे.आज गावातील सर्वच वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी शहरात इंग्रजी शाळेत शिकायला न जाता गावातील या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. कोरोना काळात गावातील मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले व तेजस्विनी अटाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन शिक्षण व “शाळा बंद- शिक्षण सुरू” हा उपक्रम गावातील पदवीधर युवतीच्या माध्यमातून यशस्वी केला आहे,या कार्याचे कौतुक तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल,आमदार बळवंतराव वानखडे यांनी केले आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षिका कु. तेजस्विनी साहेबराव अटाळकर यांच्या याच विद्यार्थी हिताय कार्याची दखल घेऊन त्याना शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याना हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले, ग्रामपंचायच सरपंच वैशालीताई निरंजन पानझाडे, उपसरपंच सुभाषराव जऊळकार, सदस्य ममताताई संतोष ठाकरे, अन्नपूर्णाताई हरिदास काळदाते,वासुदेव जऊळकर, सविताताई प्रकाश सोळंके, माधुरीताई अमोल काळे,ग्रामपंचायत सचिव विलास यादव,पोलीस पाटील ललिताताई विशाल काळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकरराव वाघमारे,शाळेचे शिक्षण समितीचे डॉ गोपाल जऊळकार,शिक्षक मित्र उपक्रमाचे समन्वयक धनंजय देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!