पुणे/ओम मोरे
आज सोमवार, १३ डिसेंबर २०२१ रोजी , पुणे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी समितीचे अध्यक्ष मा. उमाजी बिसेन तसेच सचिव मा. राजू पटेल यांच्या सह समितीचे नवनियुक्त महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. देवा तांबे यांची ,
महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, गड, किल्ले, मंदिर, सांस्कृतिक वारसा इत्यादी ची स्वच्छता तसेच देखरेख अशा अनेक विषयांवर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण संरक्षण, बेकायदेशीर वृक्षतोड, तसेच भविष्यात ऑक्सिजन चा तुटवडा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन इत्यादी विषय घेऊन महाराष्ट्र राज्य पर्यावरण व पर्यटन मंत्री – मा. आदित्य ठाकरे यांना लवकरच भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीचे राज्य उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.देवा तांबे यांनी राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशन लवकरच आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी जनशक्ती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक मा. संदिप धेबडे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
