अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळाधार पावसाची हजेरी, वेचणीला आलेला सगळा कापूस भिजला…

प्रतिनिधी विवेक मोरे :-

अमरावती वार्ता : – राज्यात मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत दिली असताना आज शनिवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या झालेल्या कडकडाटाने काही काळ विद्युत व्यवस्था बंद झाली होती.

जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव पथरोट अचलपूर परतवाडा मेळघाट आधी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली. सुमारे दीड पावणेदोन तास बरसलेल्या पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आज शनिवारी झालेल्या पावसाने पूर्ववत झालेली संत्राची वाहतूक पांदन रस्त्यांमुळे विस्कळीत झाली आहे.

दसऱ्यानंतर कापूस वेचणीचा हंगाम सुरू होतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर आणि त्यांनी कापूस वेचणीचा शुभारंभ केला. मात्र, आज झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील कापूस शेतातच ओला झाल्याचे वृत्त आहे. परतीचा हा पाऊस सर्वच पिकांसाठी धोकादायक ठरला असून शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवून वाढवत आहे.

हजारो हेक्टरवरील संत्रा बागांना गळती…

विदर्भातील संत्रा अर्थात नागपूर संत्री नुसतं नाव जरी काढलं तर अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल आकर्षक आहे. परंतु ही संत्री पिकवणारा शेतकरी मात्र सलग चौथ्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांना लागलेली पाण्यासाठी गळती मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हलाकीच्या परिस्थितीमध्ये सापडला आहे. सुरवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या संत्रा झाडावर मात्र आता निम्या पेक्षाही कमी संत्री शिल्लक नाही.

यात शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने कुठलेच वाहन संत्रा बागापर्यत जात नाही. त्यामुळे व्यापारीही शेताकडे फिरकत नाही मग संत्रा कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहली तर संत्रा बागा पूर्ण खाली होण्यासाठी उशीर लागणार नाही.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!