अमरावती वार्ता :- आजनगाव, शहापूर जुना धामणगाव येथे शेखरजी बोरकर यांच्याकडे व राजेशजी मार्वे कृष्णा कॉलनी जुना धामणगाव येथे आमदार प्रतापदादा अडसड यांनी सात्वनपर भेटी दिल्या.

आजनगाव वीज पडल्यामुळे मृत पावलेल्या किरण विलासराव थाळे यांच्या कुटुंबावर आलेले दुःख न भरून निघणारे आहे. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती त्यात घरचा कर्ता मुलगा निघून गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर ओढलेला आहे. शासनाने त्वरित त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे गरजेचे आहे.- आमदार प्रतापदादा अडसड.

यावेळी धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार शेलार साहेब, पोलीस पाटील पोपटकरभाऊ, तलाठी आजनगाव, भैय्यासाहेबजी डूबे, अरुणभाऊ डूबे, बाळासाहेब शिरपूरकर, नितीनभाऊ मेंढूले, मनोजभाऊ माळोदे व गावकरी उपस्थित होते.
रवि मारोटक ब्युरो चीफ