दिव्य काशी भव्य काशी…काशी विश्वनाथ धाम भक्तांसाठी खुले, कित्येक वर्षांनी मंदिराचा जीर्णोद्धार

वाराणसी: दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उदघाटन होते आहे.यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. २०१९मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम अवघ्या २ वर्षात पूर्णत्वास नेत काशी विश्वनाथ धाम भाविकांसाठी खुले होत आहे. या प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपये इतका खर्च अंदाजे करण्यात आला आहे. या विकासकामांमुळे आता एका वेळी लाखो भाविक या मंदिर परिसरात येऊ शकतात आणि त्यासोबत जलाभिषेकही करू शकतात.

काशी विश्वनाथ धाम हे मंदिर एका भव्य प्रांगणात बांधलेले आहे. मंदिराच्या आतील ध्वज ६० फूट उंच आहे. हा ध्वज या प्रांगणातील सर्वात उंच ध्वज आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे म्हणणे आहे की, पूर्वी ते दर्शनासाठी यायचे तेव्हा बाबा भोलेनाथांचेदेखील दर्शन नीट घेता येत नव्हते. पण आता मंदिराचे प्रांगण सहज दिसते इतके भव्य झाले आहे. तसेच आता बाबा भोलेनाथांचा जलाभिषेकही सहज करणे शक्य झाले आहे.

मंदिर निर्माणापासून ३ वेळा जीर्णोद्धार

श्री काशी विश्वनाथ मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. गेल्या जवळपास साडेचारशे वर्षात तिसऱ्यांदा या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. सर्वप्रथम काशी विश्वनाथाचे मंदिर १५८५ मध्ये बनारसमधील एक मोठे व्यापारी रघुनाथ पंडित (तोडरमल म्हणून ओळखले जाते) यांच्या प्रयत्नातुन बांधले गेले. त्यानंतर १७७७ मध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्याचे मंदिर हे अहिल्याबाईंनी बांधलेल्या स्वरूपातीलच आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची किनारही या मंदिराला आहे. मात्र नंतरच्या काळात विश्वनाथ मंदिराकडे दुर्लक्ष्य करण्यात आले. पुन्हा एकदा देश स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे ७२ वर्षांनी ८ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांतून पुन्हा एकदा मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली. यावेळेला विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करत मंदिराला थेट गंगा घाटाशी जोडून भव्य स्वरूप देण्यात आले आहे.

आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीयाने तीन प्रतिज्ञा घेतल्या पाहिजेत. स्वच्छता, सृजनशीलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी वचनबद्धता यांचा त्यांनी उल्लेख केला.

आमच्या कारागिरांचे, आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंधित लोकांचे, प्रशासनातील लोकांचे, ज्यांची येथे घरे आहेत त्या कुटुंबांचे मी अभिनंदन करतो. या सर्वांसोबतच, मी यूपी सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांचे अभिनंदन करतो, ज्यांनी काशी विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक केले आहेत. असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काशीत प्रवेश करताच सर्व बंधनातून मुक्त होतो असे आपल्या पुराणात सांगितले आहे. भगवान विश्वेश्वराचे आशीर्वाद, एक अलौकिक उर्जा आपण येथे येताच आपल्या अंतर्यामाला जागृत करतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

इथे आल्यावर फक्त श्रद्धा दिसणार नाही. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील वैभवही इथे जाणवेल. पुरातनता आणि नवीनता एकत्र कसे जिवंत होतात. प्राचीन काळातील प्रेरणा भविष्याला कशी दिशा देत आहे, आम्ही त्याचे थेट दर्शन विश्वनाथ धाम संकुलात करत आहोत. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

जीर्णोद्धारादरम्यान अनेक मंदिर एकाच कक्षेत आली

श्रीकाशी विश्वनाथ धाम जीर्णोद्धारासमयी इमारती अधिग्रहित केल्यानंतर याभागात अनेक प्राचीन मंदिरे समोर आली आहेत. ही मंदिरे निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या आड गेली होती. यासर्व प्राचीन मंदिरांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असल्याचे आढळून आले आहे. या मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट करत आहे. यातील काही प्रमुख मंदिरांमध्ये श्रीकुंभ महादेव मंदिर, श्रीबाळ मुकुंदेश्वर महादेव मंदिर, श्री आदिेश्वर महादेव मंदिर, श्रीचंद्रगुप्त महादेव मंदिर, श्रीगंगेश्वर महादेव मंदिर, श्रीचिंतामणी महादेव मंदिर, श्रीमहाकाल मंदिर आणि श्रीतारकेश्वर महादेव मंदिर इत्यादींचा समावेश आहे. आता नवीन विश्वनाथ धाम जे भाविकांच्या समोर असेल त्यात इतर ४०हून अधिक प्राचीन मंदिरांचा समावेश आहे. यासर्व मंदिरांच्या मध्यभागी भगवान काशी विश्वनाथाचे मंदिर आहे.

कोणती विकासकामे करण्यात आली?

पूर्वी घाटापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तीन ते चार मार्ग होते तेही अरुंद गल्लीतुन जात होते. मात्र आता मंदिराच्या आवारात चार मोठे दरवाजे बांधण्यात आले आहे. याशिवाय ७-८ भव्य द्वार बनविण्यात आले आहेत. जेथून भाविकांना थेट मंदिरात जाता येईल आणि मनोभावे दर्शन घेता येईल. भाविकांना हार, फुले आणि पूजासाहित्य खरेदी करता यावं यासाठी सुमारे ७० दुकानेही उभारण्यात आली आहेत. यासोबतच या दुकानांमध्ये पाण्याचे पॅन सेंटरही उभारण्यात आले आहेत. प्रसादालयेही बांधण्यात आली आहे.बारा ज्योतिर्लिनगांपैकी एक असणाऱ्या या काशिधाममध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसह सामानाचीही मोठी रेलचेल असते. प्रवाशांसाठी मोठी गेस्ट हाउसही बांधण्यात आले आहेत. परिसरात रॅम्प आणि पायऱ्या अशाप्रकारे बनविण्यात आल्या आहेत की वृद्ध आणि लहान मुले यांना सहज मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. या संपूर्ण संकुलाशिवाय मंदिराचे एक मुख्य संकुलही बांधण्यात आले आहे. प्रत्येक दिव्यांग भाविकालाही सहजपणे मंदिरात जाता येईल व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकार्पण सोहळ्यासाठी उजळून निघाले काशिधाम

या उदघाटन सोहळ्यासाठी काशिधाम उजळून निघाले आहे.भव्य दीपोत्सवाची तयारी काशीमध्ये होते आहे. शहरापासून खेड्यापर्यंतचे प्रत्येक मुख्य प्रवेशव्दार सजवण्यात येत आहेत. लोकार्पण सोहळ्यात केवळ राजकारणीच नाही तर देशभरातील संत मंडळीही सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी स्वत: देशातील सर्व श्रेष्ठसंतांशी संपर्क साधत आहेत.

देशभरात ५१ हजार ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

देशभरातल्या ५१ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी हा कार्यक्रम थेट प्रदर्शित केला जाणार आहे. काशी या प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रात देशभरातील प्रमुख ५ हजार साधू, महंत, धर्माचार्य, कीर्तनकार हे सगळे सहभागी होतील. महाराष्ट्रातून जवळपास ५१ साधू महंत काशीत दाखल होणार आहे. उदघाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना संबोधनही होईल.

महाराष्ट्रात कार्यक्रमांचे स्वरूप काय

महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्वच मंदिरांमध्ये हा कार्यक्रम होईल. महाराष्ट्रातसुद्धा २ हजाराहून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम थेट पाहिला जाईल. प्रत्येक मंडलस्तरावर प्रमुख शिवालयात किंवा मंदिर, मठात सकाळी रुद्राभिषेक होईल. त्यांनतर पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम सर्व भाविक भक्त एकत्र येऊन बघतील. महाराष्ट्रात मोठं मोठी ज्योतिर्लिंग आहेत. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे. घृष्णेश्वर आहे, भीमाशंकर आहे, मुंबईत बाभुळनाथ मंदिर आहे. अशा सर्वच मंदिरात या सोहळ्याचे आयोजन केले जाईल. प्रत्येक मंडलात, तालुक्यात हा कार्यक्रम होईल.भाजपचे सर्व प्रमुख नेते, आमदार, खासदार ते ग्रामपंचायत स्तरावरील सदस्य हे सर्व या कार्यक्रमात सहभागी होतील आणि आनंदाने हा कार्यक्रम थेट स्क्रीनवर बघणार आहेत. कार्यक्रम संपन्न झाल्यावर आरती आणि प्रसाद वाटप होईल.

काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन 339 कोटी रुपये खर्च आलाय

दररोज जवळपास 2000 मजुरांनी काम केलंय.

कॉरिडोरचा संपूर्ण परिसर जवळपास 5 लाख चौरसफुटांपर्यंत पसरला आहे.

कॉरिडोर तयार करण्यासाठी जवळपास 400 इमारतींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट तयार करण्यासाठी २ वर्ष नऊ महिन्यांचा काळ लागला आहे.

★ असं आहे काशी विश्वनाथ धाम :★


● खर्च 339 कोटी (पहिला टप्पा)
● मजूर 2000 (दररोज)
● परिसर 5 लाख चौरसफूट
● भूमी अधिग्रहण 400 इमारती
● वेळ 2 वर्ष 9 महीने

या मोठ्या प्रकल्पामुळे वाराणसीतील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हे काम सुरू करण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांनी प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरला आहे, पूर्वी संबंधित संकुल सुमारे 3000 चौरस फुटांपर्यंत मर्यादित होते, यावरुन याच्या विशालतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासावर एक नजर टाकूया.

हे मंदिर कधी बांधले आणि कितीवेळा पाडले गेले. काय आहे इतिहास? काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. त्याच्या बांधकाम आणि पुनर्बांधणीबद्दल विविध सिद्धांत आहेत. इतिहासकार सांगतात की विश्वनाथ मंदिर अकबराच्या नौरत्नांपैकी एक राजा तोडरमल याने बांधले होते.

संग्रहित छायाचित्रे काशी

काशी विद्यापीठातील इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक यांच्या म्हणण्यानुसार, ‘विश्वनाथ मंदिर राजा तोडरमलने बांधले होते, याचे ऐतिहासिक पुरावे आहेत आणि तोडरमल यांनीही अशी अनेक बांधकामे केली आहेत. मात्र, अकबराच्या आदेशाने त्यांनी हे काम करून घेतले, ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या पटणारी नाही. अकबराच्या दरबारात राजा तोडरमलची स्थिती अशी होती की त्यांना या कामासाठी अकबराच्या आदेशाची गरज नव्हती. ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

काशी संग्रहित छायाचित्रे

काशी विश्वनाथ मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या मंदिरात जाऊन पवित्र गंगेत स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.
11व्या शतकात बांधकाम हे मंदिर गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. 11 व्या शतकात हे मंदिर राजा हरिश्चंद्र यांनी पुन्हा बांधले होते असे सांगितले जाते.

1194 मध्ये मुहम्मद घोरीने हे पाडले. यानंतर मंदिराचे पुन्हा एकदा निर्माण करण्यात आले. पण, 1447 मध्ये जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने ते पुन्हा भूईसपाट केले. जर आपण इतिहासाची पाने चाळली तर तर लक्षात येईल की काशी मंदिराचे बांधकाम आणि पाडण्याच्या घटना 11 व्या शतकापासून 15 व्या शतकापर्यंत चालू होत्या.
मंदिर तोडण्यासाठी शाहजहाननं सैन्य पाठवलं सन 1585 मध्ये पंडित नारायण भट्ट यांनी राजा तोडरमल यांच्या मदतीने ते बांधले होते. मात्र, 1632 मध्ये शाहजहानने ते तोडण्यासाठी सैन्याची तुकडी पाठवली. हिंदूंच्या विरोधामुळे सैन्य आपल्या उद्दिष्टात यशस्वी होऊ शकले नाही. असे म्हणतात की 18 एप्रिल 1669 रोजी औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता.

विद्यमान मंदिर कधी बांधलं?

सुमारे 100 वर्षांनंतर औरंगजेबाने हे मंदिर पाडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सुमारे 125 वर्षे येथे विश्वनाथ मंदिर नव्हते. विद्यमान विश्वनाथ मंदिर 1780 मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. नंतर महाराजा रणजित सिंह यांनी 1853 मध्ये 1000 किलो सोने दान केले.

या मंदिराला भेट देण्यासाठी आदि शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, गोस्वामी तुलसीदासही आल्याचे सांगितले जाते. सवाई माधवपूरपेक्षा राजस्थानातील ‘या’ शहराला भेट द्या, पैसा वसूल ट्रिप होईल! 5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात काशी विश्वनाथ धाम आता तब्बल 286 वर्षांनंतर हे मंदिर नव्या अवतारात जगासमोर येत आहे. सुमारे 5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात काशी विश्वनाथ धाम पूर्णपणे तयार आहे. या भव्य कॉरिडॉरमध्ये 23 लहान-मोठ्या इमारती आणि 27 मंदिरे आहेत.

कॉरिडॉर 3 भागांमध्ये विभागलेला आहे. प्रदक्षिणा मार्गावर 4 मोठे दरवाजे आणि 22 संगमरवरी शिलालेख आहेत. यामध्ये काशीचे वैभव वर्णन केले आहे.
मंदिराजवळ मशीद मंदिरासोबतच ज्ञानवापी मशीद आहे. मंदिराच्या मूळ जागेवरच मशीद बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. ज्ञानवापी मशीद मुघल शासक औरंगजेबाने मंदिर तोडून बांधली होती. याशिवाय आलमगिरी मशीद देखील आहे, तीही औरंगजेबाने मंदिर तोडून बांधली असल्याचे सांगितले जाते.
काशी विश्वनाथ मंदिराचे महत्व

काशी ची अशी आख्यायिका आहे की काशी ही भगवान शिवाच्या त्रिशूलाच्या टोकावर वसलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येथे विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पवित्र शहरांच्या यादीत काशीचे नाव आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की भगवान विश्ननाथ येथे ब्रम्हांडच्या स्वामींच्या रुपात वास्तव्य करतात. काशी हे शिव आणि पार्वतीचे आवडते स्थान असून येथील विश्वनाथ मंदिर हे शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिमेकडील घाटावर हे मंदिर आहे. तसेच पैराणिक कथांनुसार काशीतील बाबा विश्वनाथाच्या दर्शनामुळे पापमुक्ती मिळते. तर मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!