बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ उपविभाग दर्यापूर यांना तीन महिन्याचे वेतन न मिळाल्याबाबत बेमुदत अन्नत्याग उपोषण

दर्यापूर – महेश बुंदे

बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ उपविभाग दर्यापूर येथे एक ऑगस्ट २०२१ डीएम दहिफळे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर एजन्सी यांचे मार्फत महावितरणच्या सेवेत बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून सेवेत आहेत तेव्हापासून सर्व जण दैनंदिन कामे जिव मुठीत घालून करीत आहेत पण त्याचा मोबदला अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही.

त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे असे या निवेदनात म्हटले आहे. दिवाळी सुद्धा आमची अंधारात गेली वेतन अद्यापही मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी विद्युत विभागासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली होती.

त्यावेळी मात्र एका महिण्याचे वेतन मिळाले आता मात्र २ महिने उलटूनही वेतन न मिळाल्यामुळे विद्युत विभागांमध्ये कार्यरत असलेले बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी डीएम व सुपरवायझर यांच्याशी सतत संपर्क केला असता उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले त्या कारणास्तव आम्ही बेमुदत अन्नत्याग उपोषणनाला सुरुवात करणार असल्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या तीन महिन्यापासूनचे रखडलेले बिल लवकरात लवकर बँक खात्यामध्ये रक्कम वरिष्ठांनी जमा करावी तसेच आम्हाला व आमच्या कुटूंबियांना कमी जास्त झाल्यास सर्वस्व सुपरवायझर जबाबदार राहतील असे शरद सपकाळ, योगेश भेलकर, अविनाश पवार, राहुल कुऱ्हाडे, राम बानोडे, राहुल विजेकर, निलेश कळसकर, श्‍याम राजगुरे, कमल कुमार वाकोडे, अहमद खान मोहम्मद खान, सुधीर गवई, अंकुश गावंडे, गजानन खिरकर, मंगेश मंडासे, अतुल गवार, वृषभ शेलार, अक्षय वाठ, सूर्यकांत डोंगरदिवे, सुनील भोयर, अफसर सय्यद, अक्षय वासनकर, रोशन चारथळ, अक्षय भदे, अजय बनारसे, कांचन गव्हाळे, आनंद ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!